AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणशी करार अंतिम टप्प्यात…आम्हाला घाई नाही, पण वेळ आमच्यासोबत – डोनाल्ड ट्रम्प

इराणसोबत अमेरिकेचा शांतता करार होणार की नाही यावरुन उलट सुलट बातम्या येत असतानाच इराणच्या डीलवरुन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे.

इराणशी करार अंतिम टप्प्यात...आम्हाला घाई नाही, पण वेळ आमच्यासोबत - डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump
| Updated on: May 24, 2026 | 9:55 PM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण करारावर एक मोठे विधान केले आहे. जोपर्यंत या कराराला मान्यता मिळून त्यावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी सुरूच राहील. ट्रम्प पुढे म्हणाले की, वाटाघाटी योग्य दिशेने पुढे जात आहेत, परंतु कोणतीही घाई केली जाणार नाही, इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल साईट ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये ते लिहितात की जोपर्यंत कोणतेही एग्रीमेंट होत नाही, सर्टीफाय होत नाही आणि सह्या होत नाहीत. तोपर्यंत नाकाबंदी संपूर्णपणे लागू राहिल. दोन्ही पक्षांनी त्यांचा वेळ घ्यायला हवा आणि यास योग्य करायला हवे म्हणजे कोणतीही त्रूटी राहू नये !

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे बोलणी योग्य आणि चागंल्या पद्धतीने होत आहेत. आणि आपण आपल्या प्रतिनिधींना सांगितलेले आहे की जोपर्यंत आपण योग्य वेळेत आहोत,त्यांनी कोणत्याही डीलवर घाई करु नये..ट्रम्प म्हणाले की इराण सोबत आमचे नाते खूपच जास्त प्रोफेशनल आणि प्रोडक्टिव्ह होत जात आहे. मात्र, त्यांना हे कळायला हवे की ते न्युक्लिअर वेपन वा बॉम्ब बनवू शकत नाहीत वा खरेदी करु शकत नाही.

ते म्हणाले की आपण आतापर्यंत मध्य पूर्वेतील सर्व देशांच्या पाठींबा आणि सहयोगासाठी त्यांना धन्यवाद देऊ इच्छीतो, जो ऐतिहासिक अब्राहम अकॉर्ड्सच्या देशांमध्ये सामील होण्याने आणखी वाढेल आणि मजबूत होईल, कोण जाणे कदाचित इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण देखील यात सामील होऊ इच्छीत असेल !

याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल अकाऊंटवर Adios (स्पॅनिशमध्ये अलविदा )कॅप्शनवाली एक AI ने बनवलेली इमेज पोस्ट केली होती, ज्यात एक US ड्रोन इराणी नेव्हीच्या जहाजांना नष्ट करताना दिसत आहे.

 बराक ओबामावर केला आरोप

ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर सर्वात खरा डील्सपैकी एक केल्याचा आरोप लावला, ज्यामुळे इराणसाठी न्यूक्लिअर वेपन तयार करण्यास संधी मिळाली. त्यांनी सोशल मीडियावर लिहीले की आमच्या देशाच्या आतापर्यंतच्या सर्वात खराब डील्सपैकी ही एक इराण न्यूक्लिअर डिल होती. ज्याला बराक हुसैन ओबामा आणि ओबामा एडमिनिस्ट्रेशनच्या नवशिक्यांनी सादर केले आणि साईन केले होते. हा इराणसाठी न्युक्लिअर वेपन बनवण्याचा थेट मार्ग होता. ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन इराणसोबत ज्या ट्राझक्शनवर बातचीत करत आहे, त्याच्या सोबत असे होणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’पोस्ट केले की , इराण आणि शांततेसंबंधीच्या सामंजस्य कराराशी संबंधित सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी आखाती देशांच्या नेत्यांशी, तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असिम मुनीर यांच्याशी त्यांचे ‘अतिशय चांगले’ संभाषण झाले. यानंतर ही घडामोड समोर आली आहे.

ट्रम्प यांचा बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद

ट्रम्प असेही म्हणाले की त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी दावा केला की,हा एक करार मोठ्या प्रमाणात अंतिम टप्प्यात आहे, मात्र, अंतिम तपशिलांवर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत आणि त्या लवकरच जाहीर केल्या जाऊ शकतात. त्यांनी पुढे असेही सांगितले की, प्रस्तावित करारामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे