AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुकूमशाहा किम जोंग उन झाला जोसेफ, पासपोर्टचा फोटो समोर आल्याने खळबळ; नेमकं प्रकरण काय?

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याने बनावट पासपोर्ट तयार केला होता असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या पासपोर्टमध्ये त्याचे नाव जोसेफ होत, असे म्हटले जात आहे.

हुकूमशाहा किम जोंग उन झाला जोसेफ, पासपोर्टचा फोटो समोर आल्याने खळबळ; नेमकं प्रकरण काय?
kim jong un fake passportImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2026 | 6:16 PM
Share

Kim Jong Un : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन कधी काय करेल, हे सांगता येत नाही. त्याचे शस्त्रांवरील प्रेम काही लपून राहिलेले नाही. एकीकडे इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना दुसरीकडे किम जोंग उन हा अनेक मोठ्या आणि संहारक शस्त्रांच्या चाचण्या करत आहे. दरम्यान, किम जोंग उनबाबत सध्या एक अजब दावा केला जात आहे. किम जोंग उनने आपले नाव जोसेफ असे करून ब्राझिल या देसाचा खोटा पासपोर्ट तयार केला होता, असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर तर या बनावट पासपोर्टचा फोटोदेखील व्हायरल झाला आहे.

किम जोंग उन गेला होता जपानमध्ये

व्हायरल पोस्टमधील दाव्यानुसार मे 1991 साली किम जोंग उन 8 वर्षांचा होता. तेव्हा किम जोंग तसेच त्याचा मोठा भाू किम जोंग चुल या दोघांनी ब्राझिलचे खोटे पासपोर्ट तयार केले होते. याच बनावट पासोपर्टच्या मदतीने दोघांनाही जपान या देशात प्रवेश केला होता. ते दोघेही जपान फिरून आले होते. त्याच्यासोबत तेव्हा उत्तर कोरियाचे 10 अधिकारीदेखील होते. विशेष म्हणजे हे सर्वजण एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जपानमध्ये होते. याच काळात लहानपणी किम जोंग ऊन तसेच त्याच्या मोठ्या भावाने अनेकदा डिज्निलँडचा दौरा केला होता.

सावत्र भावाला झाली होती अटक

व्हायरल पोस्टमधील दाव्यानुसार हा बनावट पासपोर्ट तयार करताना किम जोंग उनने आपले नाव जोसेफ असल्याचे सांगितले होते. 2001 साली किम जोंग उनचा सावत्र भाऊ किम जोंग नाम यानेही बनावट पासपोर्टच्या मदतीने जपानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला विमानतळावरच पकडण्यात आले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा किती सत्य आहे, असे विचारले जात आहे. बीबीसीच्या 2018 सालच्या एका रिपोर्टनुसार किम जोंग उन आणि त्याचे वडील किम जंग इल यांनी 1990 च्या दशकात ब्राझिलचे बनावट पासपोर्ट तयार केले होते. या पासपोर्टमध्ये किम जोंग उनचे नाव ‘Josef Pwag’ असे होते.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?