
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या तूफान चर्चेत आहेत. जगातून गाझापट्टीतील शांततेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुक केले जातंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार अर्मेनिया आणि अल्बेनियामधील समस्या दूर केल्यामुळे युरोपियन राजकीय समुदायाच्या अलिकडच्या बैठकीत नेत्यांमध्ये हशा उठल्या. ऑगस्टमध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या आर्मेनिया-अझरबैजान शांतता करार मीच केल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी स्वतःला नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र घोषित केले तेव्हा ही घटना चर्चेत आली. ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत अझरबैजानचा उल्लेख अबर-बैजान केला आणि अझरबैजान-अल्बेनिया युद्ध संपवल्याचा वारंवार दावा केला.
ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे म्हणत प्रत्यक्षात त्यांनी आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्धबंदी घडवून आणल्याचे दोन्ही देशांनी म्हटले. कंबोडिया आणि आर्मेनियामधील संघर्ष संपवण्याबद्दल त्यांनी यापूर्वीही बरीच दावे केली आहेत. दोन्ही देशांमध्ये खूप जास्त जुना वाद आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संपवलेल्या सात युद्धांपैकी एक आर्मेनिया-अझरबैजान हे युद्ध होते. रोपियन शिखर परिषदेत ते सतत चुकीचे नाव घेत असल्याने पेच निर्माण झाला.
हेच नाही तर त्यांनी दावा केला की, हे त्यांचे काम नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहे. यादरम्यान त्यांनी काश्मीर प्रश्नाला हजार वर्षे जुना वाद म्हणूनही संबोधले. मध्यंतरी चर्चा होती की, ट्रम्प हे काश्मीर प्रश्नामध्ये मध्यस्थी करणार आहोत. मात्र, भारताने याला विरोध करत यामध्ये कोणत्याही इतर देशाचा हस्तक्षेप आम्ही सहन करणार नसल्याचे स्पष्ट म्हटले. काश्मीरच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट म्हटले की, हा वाद अनेक वर्षांचा आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध अधिक चांगले झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अमेरिकेची मदत मागितली होती. ट्रम्प कायमच दावा करतात की, भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिकेने मध्यस्थी केली होती. मात्र, भारताने याला अनेकदा स्पष्टपणे नकार दिला आहे.