युद्ध संपणार, डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट मोठी अपडेट, जगाने…

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आला. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यामध्येच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले आहे.

युद्ध संपणार, डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, थेट मोठी अपडेट, जगाने...
Donald Trump
| Updated on: Mar 10, 2026 | 7:27 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने युक्तपणे 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर मोठा हल्ला केला. इराणने थेट ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ला करत थेट रडार स्टिटम खराब केले. दुबईसह अन्य आखाती देशांवर मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. या युद्धात फक्त या तीनच देशांचे नुकसान झाले नसून आखाती देशांसोबत इतरही देशांचे नुकसान झाले. भारतासह अन्य देशांना या युद्धाचा फटका बसत आहे. अमेरिका आणि इराण युद्ध टोकाला गेले. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबवावे अशी मागणी केली जात आहे. आखाती देशही अमेरिकेवर भडकले. मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे विधान जारी केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे जवळपास हे युद्ध संपल्याचे थेट मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांचा प्रयत्न करण्याविरुद्ध कडक इशारा दिला आहे. म्हणजे युद्ध संपल्यानंतरही अमेरिकेचे इराणवर बारीक लक्ष असणार आहे. नुकताच बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, युद्ध जवळपास संपलेच आहे.

ट्रम्प म्हणाले की, इराणच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले. मुळात म्हणजे त्यांच्याकडे आता नाैदल राहिले नाही. त्यांचा हवाई दल देखील संपले आहे. त्यांच्या क्षेपणास्त्र प्रणाली विस्कळीत आहेत. त्यांचे जवळपास सर्वच ड्रोन आम्ही पाडले. हेच नाही तर त्यांचे ड्रोन तयार करण्याचे कारखाने आम्ही उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिले नाही.

सध्याच्या घडीला हे युद्ध जवळपास संपले आहे. लढण्यासाठी त्यांच्याकडे काही उरले नाही. ट्रम्प यांनी असा दावा केला की तेहरानकडे आता लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत काहीही उरलेले नाही. जगातील जवळपास देशांची हीच इच्छा आहे की, हे युद्ध इथेच थांबले पाहिजे. थेटपणे या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर होताना दिसत आहे. तेल आणि गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us