AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला युद्ध करायचे ना करा, पण… अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबद्दल मोठा दावा, म्हणाले, मी दोन्ही देशांना…

भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा करताना डोनाल्ड ट्रम्प कायमच दिसतात. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत भारत पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा केला आहे.

तुम्हाला युद्ध करायचे ना करा, पण... अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबद्दल मोठा दावा, म्हणाले, मी दोन्ही देशांना...
Donald Trump India Pakistan War
| Updated on: Oct 16, 2025 | 7:58 AM
Share

मागील काही दिवसांपासून भारत-अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. मात्र, पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प भारताबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना दिसले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अगोदर भारतामध्ये प्रत्येक वर्षाला नेते बदलले जात. पण माझे मित्र नरेंद्र मोदी बऱ्याच वर्षांपासून आहेत आणि ते खूप जास्त चांगले काम करत आहेत. पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प हे परत एकदा भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बोलताना दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत पाकिस्तानमध्ये परिस्थिती अधिक वाईट होती आणि तिथे चुकीच्या गोष्टी घडत होत्या. सात विमाने पाडली गेली होती आणि परिस्थिती अधिक बिघड जात होती. दोन्ही देशांना मी फोन करून स्पष्ट सांगितले की, हे युद्ध ताबडतोब थांबवा.

जर तुम्ही हे युद्ध थांबवले नाही तर मी मोठा टॅरिफ तुमच्या दोघांवरही लावेल. अमेरिका कोणत्याही प्रकारची व्यापार चर्चा दोन्ही देशांसोबत करणार नाही आणि तुमच्या ज्या वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत येतात, त्यावर 200 टक्के टॅरिफ लावणार आहे. करा तुम्हाला युद्ध करायचे आहे ना… त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण झाल्याचा दावा पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प  यांनी केला आहे. पाकिस्तान देखील यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करताना दिसला आहे.

भारताने वेळोवेळी याबद्दल स्पष्टपणे म्हटले की, भारत-पाकिस्तान युद्धात कोणीही हस्तक्षेप केला नाही तर दोन्ही देशांनी व्दिपक्षीय करार करत हे युद्ध थांबवले आहे. गाझा शांतता शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी तिथे जाणे टाळले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राजदूत सर्जियो गोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल सांगितले की, मला वाटते की, खूप चांगली भेट राहिली. मोदी हे महान व्यक्ती आहेत. गोरने मला सांगितले की, पीएम मोदींना डोनाल्ड ट्रम्प आवडतात. मी भारताला अनेक वर्षांपासून पाहत आलो. भारत खरोखरच एक खास देश आहे. काही लोक भारतात काही दिवसांसाठी जातात आणि काही महिने तिथे राहतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...