AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक घोषणा, या देशाचे पंतप्रधान अखेर…

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात मध्यस्थी करून हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातोय. मात्र, दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला धमकावले देखील आहे. मात्र, यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केलीये.

मोठी बातमी! टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक घोषणा, या देशाचे पंतप्रधान अखेर...
Donald Trump
| Updated on: Sep 30, 2025 | 7:30 AM
Share

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू असून या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसताना दिसतंय. इस्रायलकडून गाझा शहराला टार्गेट केले जातंय. दुसरीकडे अमेरिका आणि इतर देशही इस्रायलचे मोठे नुकसान करत आहेत. शिवाय इस्रायल आर्थिक कोंडीत पकडण्याचा डाव रचला गेला. हमासकडूनही इस्रायलला प्रत्युत्तर दिले जात आहे. हे युद्ध थांबावे याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रयत्न करताना दिसले. त्यांनी यापूर्वी मुस्लीम नेत्यांची आणि हमासची एक बैठक घेतली. यामध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आला. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले.

हमाससोबच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना भेटीसाठी बोलावले. त्यांच्यासमोर देखील त्यांनी तो युद्ध बंदीचा आणि निर्णयाचा प्रस्ताव ठेवला. या युद्ध बंदीच्या प्रस्तावाला बेंजामिन नेतान्याहू यांनीही सहमती दाखवली. व्हाईट हाऊसमधील आपल्या भाषणात ट्रम्प यांनी या प्रस्तावाला नेतन्याहू यांनी सहमती दिल्याचे सांगत त्यांचे आभार देखील मानले. हेच नाही तर त्यांनी मध्य पूर्वेमध्ये कायमस्वरूपी शांतता आणण्याची संधी असल्याचेही म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला नक्कीच विश्वास आहे की, हा करार हमास आणि इतर देशांकडून देखील मान्य केला जाईल. जर त्यांनी देखील या प्रस्तावाला सहमती दिली तर युद्ध लगेचच थांबवले जाईल. या युद्धाबाबत व्हाईट हाऊसने त्यांची 20 कलमी योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये तात्पुरत्या गव्हर्निंग बोर्डाची माहिती आहे. या प्रस्तावात स्पष्ट म्हणण्यात आले की, पॅलेस्टिनींना गाझा सोडण्याची आवश्यकता नाही आणि दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी होताच तात्काळ युद्धबंदीची मागणी केली आहे.

जर हमास देखील सहमत असेल, तर प्रस्तावात सर्व ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यामुळे युद्ध संपेल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हे युद्ध संपत असल्याची मोठी घोषणा करण्यात आलीये. मात्र, अजूनही हमासच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच हमासला हाताशी धरले आहे. त्यामध्ये आता इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अमेरिकेत गेल्याने हे युद्ध संपण्याचे संकेत आहेत.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात