AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला धक्का! H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल, तब्बल 88 लाख…

Donald Trump H-1B Visa Rule Changes : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. शिवाय त्यांनी व्हिसाच्या नियमातही काही मोठे बदल केली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जगाला हादरवणारा निर्णय घेतला आहे, ज्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला धक्का! H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल, तब्बल 88 लाख...
Donald Trump H-1B Visa
| Updated on: Sep 20, 2025 | 7:30 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे H-1B व्हिसामध्ये मोठे बदल करणार असल्याची जोरदार चर्चा ही मागील काही दिवसांपासून सतत रंगताना दिसली. आता शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला मोठा धक्का दिल्याचे बघायला मिळत आहे. त्यांनी H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय घेतला असून अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता स्वप्न राहण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेत भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात H-1B व्हिसावरच जातात आणि नोकऱ्या करून चांगले पैसे कमावतात. आता H-1B व्हिसासाठी नवीन नियमानुसार मोठे पैसे मोजावी लागणार आहेत. भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मात्र, सध्या टॅरिफच्या मुद्द्यामध्ये दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता थेट नियमात बदल करण्यात आलाय.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसामध्ये बदल करून खळबळ उडवलीये. H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत गैर-स्थलांतरित कामगार म्हणून थेट प्रवेश मिळू शकणार नाही. आता नव्या नियमाप्रमाणे नवीन अर्जासाठी $100,000 म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे 88 लाख रुपयांपेक्षाही जास्त शुल्क भरावे लागेल. नवीन $100,000 शुल्कामुळे कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होईल. यामुळे कंपन्या या शक्यतो हे शुल्क टाळण्यासाठी स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी भर देतील.

88 लाख रुपयांचे शुल्क भरण्यासाठी मोठ्या कंपन्यांना फार काही अडचण नक्कीच नसणार आहे. मात्र, छोट्या कंपन्यांसाठी ही नक्कीच मोठी समस्या बनेल. असे सांगितले जात आहे की, या व्हिसाचा खूप जास्त दुरूपयोग होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत काम करणारी जास्त करून भारतीय लोक याच व्हिसावर गेलेले आहेत. मात्र, आता नवीन H-1B व्हिसा मिळवणे आणि त्यावर अमेरिकेत जाऊन काम करणे म्हणजे मोठे आव्हान आहे.

याबद्दल बोलताना व्हाईट हाऊसचे कर्मचारी सचिव विल शार्प यांनी म्हटले की, H-1B नॉन-इमिग्रंट व्हिसा प्रोग्राम हा सर्वात जास्त गैरवापर होणाऱ्या व्हिसापैकी एक आहे. या नियमामुळे अमेरिकन लोकांना काम मिळण्यासही मदत होईल. मात्र, आता H-1B व्हिसा घेऊन अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी ही मोठी समस्या बनली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?