AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोपर्यंत सैनिक मरत नाहीत… ट्रम्पशाहीला मोठा दणका, इराणच्या युद्धात मोठ्या घडामोडी..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवले पाहिजे, अशी भावना सर्वांची आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लोक एकवटत आहेत.

जोपर्यंत सैनिक मरत नाहीत... ट्रम्पशाहीला मोठा दणका, इराणच्या युद्धात मोठ्या घडामोडी..
Donald Trump
| Updated on: Jun 04, 2026 | 9:34 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणसोबतच्या युद्धात नक्की काय करायचे आहे हे जगाला कळत नाही. ना ते इराणवर हल्ला करण्याची हिमत करत आहेत ना आपल्या अटी मागे घेत आहेत. इराणच्याही अटी मान्य करत नाहीत. इराण आणि अमेरिका युद्धात जगाची वाट लागली. मात्र, दोन्ही देश माघार घेत नाहीत. यादरम्याचन आता डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठकीत इराण विरोधातील युद्धाबाबत महत्वाची भूमिका घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणवर तोपर्यंत हल्ला होणार नाही, जोपर्यंत कोणता अमेरिकी सैनिक मरणार नाही. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली. मुळात म्हणजे त्यांना मोठा दणका अमेरिकेतूनच मिळाला आहे. ज्यानंतर त्यांनी हे विधान केले. युएस हाऊसने डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध शक्तीला रोखले आहे. ते कोणत्याही नवीन हल्ल्यांचे आदेश देऊ शकणार नाहीत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. वॉल स्टिटच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना खासगीत म्हटले की, तेहरान अमेरिकेच्या सैनिकांना मारत असेल तरच आपण युद्धविराम संपवण्याचा विचार करू शकतो. त्याशिवाय अजिबातच नाही. त्यांनी स्पष्ट म्हटले की, हिंसक हल्ले आणि एयरस्ट्राइकवर काही आठवड्यांपासून बंदी आली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने बुधवारी एक ठराव मंजूर केला.यामध्ये राष्ट्राध्यक्षांचे युद्धविषयक अधिकार मर्यादित केले जातील आणि इराणमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवली जाईल. हा मोठा दणका डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराला म्हणावा लागेल. हाऊसमध्ये हा प्रस्ताव 215 च्या संख्येत 208 ने पास झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाच्या सदस्यांनीही त्यांची साथ दिली नाही.

म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणविरोधातील युद्ध कोणालाच आवडत नाही. राष्ट्रपतींनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट निर्देश दिले की, इराणमधून अमेरिकेचे सैनिक परत बोलवा. यासोबतच युद्ध वाढेल अशी कोणीही कारवाई न करण्यावरही बंदी घालण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शक्ती आता थेटपणे कमी करण्यात आल्या आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांना इच्छा असलीतरीही ते कोणत्याही प्रकारचा हल्ला इराणवर करू शकणार नाहीत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात