AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या एका गोळीमुळे ट्रम्प यांच्या जीवाला धोका, हेल्थ रिपोर्टमध्ये हादरवून टाकणारी नोंद, डॉक्टरांच्या सल्ल्याने चिंता वाढली!

समोर आलेल्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांचे सध्याचे वजन 108 किलो आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये केलेल्या वैद्यकीय चाचणचीत त्यांचे वय 101.6 किलो होते. ट्रम्प यांची उंची सहा फुट तीन उंच एवढी आहे.

या एका गोळीमुळे ट्रम्प यांच्या जीवाला धोका, हेल्थ रिपोर्टमध्ये हादरवून टाकणारी नोंद, डॉक्टरांच्या सल्ल्याने चिंता वाढली!
donald trump healthImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2026 | 9:42 PM
Share

Donald Trump Health Report : सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष हेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. त्यांच्या एका इशाऱ्याने इराणचे युद्ध संपुष्टात येऊ शकते. युद्ध संपुष्टात आले तर जगभरात निर्माण झालेली इंधन टंचाई लगेच संपू शकते. भारतात पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांचा भाव स्थिरावू शकतो. दरम्यान, हेच डोनाल्ड ट्रम्प आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकन प्रशासनाने त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचा रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. या मेडिकल रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांना डॉक्टरांनी काही महत्त्वाचे सल्ले दिलेले असल्याने चिंतादेखील व्यक्त केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यंच्या हेलथ रिपोर्टमध्ये काय आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच वॉशिंग्टन येथील वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी सेंटरमध्ये आरोग्यविषयक नियमित चाचण्या केल्या होत्या. या चाचण्यांचा रिपोर्ट व्हाईट हाऊसचे डॉक्टर तथा अमेरिकन नौसेनेचे कॅप्टन शॉन बार्बाबेला यांनी या चाचण्यांचा मेडिकल रिपोर्ट जारी केला. या मेडिकल रिपोर्टनुसार त्यांची प्रकृती चांगली आहे. ते देशाचे नेतृत्त्व करायला पूर्णता तंदुरुस्त आहेत. त्यांचे हृदय, फुफ्फुस, स्वरयंत्र चांगले कार्यक्षम आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. परंतु त्यांना काही बाबतीत काळजी घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

डॉक्टरांचा नेमका सल्ला काय?

डॉक्टरांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आरोग्यविषयक काही सल्ले दिले आहेत. यात ट्रम्प यांनी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. शरीरिची हालचाल वाढवावी. वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. हृदयाच्या सुरक्षेसाठी अॅस्प्रिनच्या गोळ्या कमी घ्याव्यात, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प कोणकोणते औषध घेतात

समोर आलेल्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांचे सध्याचे वजन 108 किलो आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये केलेल्या वैद्यकीय चाचणचीत त्यांचे वय 101.6 किलो होते. ट्रम्प यांची उंची सहा फुट तीन उंच एवढी आहे. ते सध्या एकूण तीन औषधं घेतात. यातील दोन औषधं हे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहेत. तर तिसरे अॅस्प्रिन हे हृदयरोग होऊ नये यासाठी आहे.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन