Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, 15 टक्के टॅरिफनंतर नवा जबर धक्का? भारतीय वंशाच्या वकिलाने…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी 15 टक्के टॅरिफ लागू केला आहे. त्याला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, 15 टक्के टॅरिफनंतर नवा जबर धक्का? भारतीय वंशाच्या वकिलाने...
donald trump
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 22, 2026 | 3:34 PM

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी 100 पेक्षा जास्त देशांवर लादलेला टॅरिफ हा असंवैधानिक आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानंतर ट्रम्प सरकारने अगोदरच टॅरिफ असलेल्या देशांवर सरसकट 10 टक्के कर लागू केला. ट्रम्प यांनी न्यायालयावर टीका करत हे आयात शुल्क लागू केले आहे. ट्रम्प यांच्या या अशा वागण्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत एका प्रकारची अस्थिरता निर्माण झाल आहे. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला हादरवणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी नव्याने लादलेला टॅरिफ 10 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. आता या सर्व घडामोडी घडत असताना डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का देणारी माहिती समोर येत आहे. ट्रम्प यांना पुन्हा एकदा जोरदार झटका बसू शकतो.

नेमकी काय माहिती समोर आली?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लावलेला 10 टक्के टॅरिफ आता 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या निर्णयाचा भारतासह इतरही अनेक देशांवर परिणाम पडणार आहे. परंतु आता ट्रम्प यांच्या या निर्णयालादेखील कायदेशीर आव्हान दिले जाऊ शकते. तशी माहिती भारतीय वंशाचे अमेरिकन वकील नील कात्याल यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी घेतलेला हा नवा निर्णय अमेरिकन संविधानाच्या विरोधात असेल तर त्या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असं ते म्हणाले आहेत. म्हणजेच भविष्यात ट्रम्प यांच्या 15 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयालाही आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

ट्रम्प सरकार वेगळा अर्थ काढत आहे

नील कात्याल यांच्या मतानुसार ट्रम्प प्रशासन ज्या सेक्शन 122 च्या आधारावर टॅरिफ लावत आहे, त्या कलमाचा अर्थ वेगळा काढला जात आहे. सर्वोच्च न्यायालयापुढे या कलामाचा वेगळा अर्थ सांगण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ लावायचा असेल तर त्यासाठी अमेरिकन काँग्रेस म्हणजेच अमेरिकेच्या संसदेत तसा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे.

भारतासाठी आशादायी चित्र

दरम्यान, ट्रम्प यांच्या 15 टक्के टॅरिफलाही आव्हान दिले जाण्याची शक्यता असल्याने भविष्यात भारतासह अन्य देशांनाही दिलासा मिळण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.