AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, स्वप्न भंगले, पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता, एक चूक नडली…

डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपासून सतत नोबेल पुरस्कारासाठी दावा करताना दिसले. मात्र, आता त्यांचे हे स्वप्न नोबेल पुरस्काराच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीये. मात्र, या शर्यतीतून त्यांना एका चुकीमुळे बाहेर पडावे लागले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, स्वप्न भंगले, पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता, एक चूक नडली...
Donald Trump angry
| Updated on: Oct 06, 2025 | 9:22 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांती पुरस्कार मिळण्यासाठी दावा करत होते. जगातील सात युद्ध मी रोखली असल्याने नोबेल शांती पुरस्कार मिळायला हवा. ऑक्टोबरमध्ये जेव्हा नोबेल पारितोषिकांची घोषणा केली जाते तेव्हा जगाचे लक्ष विजेत्यांकडे असते. ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडली जाते. सर्वात अगोदर वैद्यकशास्त्र पुरस्कार जाहीर केला जातो, त्यानंतर अनुक्रमे भौतिकशास्त्र, साहित्य, रसायनशास्त्र, शांतता या विषयांसाठी पुरस्कार जाहीर केले जातात. नामांकन फक्त निवडक व्यक्तींसाठीच असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल शांती पुरस्कारासाठी दावा केल्याने हा पुरस्कार नेमका कोणाला मिळतो, याकडे जगाच्या नजरा आहेत.

विशेष म्हणजे नामांकित व्यक्ती आणि प्रस्तावकांची ओळख तब्बल 50 वर्षांसाठी गुप्त ठेवली जाते. हे धोरण निवडीची निष्पक्षता सुनिश्चित करते. प्रत्येक श्रेणीसाठी तज्ज्ञ समित्या उमेदवारांची पुनरावलोकन करतात. अल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रात नमूद केलेल्या तत्त्वांची पूर्तता करतात याची खात्री केली जाऊ शकेल. ही सर्व प्रक्रिया अत्यंत गुप्तपद्धतीने पार पडले. यामध्ये कोणाचेही हस्तक्षेप अजिबात नसतो.

नोबेल पुरस्कारासाठी सतत दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार जाहीर होण्याच्या अगोदरच मोठा धक्का बसला.  दरवर्षी नोबेल पुरस्कारासाठी हजारो नावे प्रस्तावित केली जातात आणि ही यादी 50 वर्षांसाठी सुरक्षित बंद ठेवली जाते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय, नाटो, हाँगकाँगचे चाऊ हाँग-तुंग आणि कॅनेडियन मानवाधिकार वकील इर्विन कोटलर यांच्या प्रतिनिधींसह तब्बल 338 नामांकित उमेदवार आहेत.

यादरम्यान काही नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नामांकित केले होते. परंतु त्यांचा प्रस्ताव अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 31  जानेवारीला आला, त्यामुळे ते या पुरस्कारासाठी वैध नाहीत. अमेरिकन काँग्रेसमन बडी कार्टर, कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात यावा, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...