AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचे सैन्य अमेरिकेच्या नियंत्रणाखाली, अमेरिकेचा युद्धात विजय? डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट दावा..

अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यांमुळे जगाची झोप उडाली. डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपल्याची मोठी घोषणा करतील, असा अंदाज जगाचा असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा धक्का देण्यात आला. युद्ध नक्की कधी संपणार यावरही त्यांनी भाष्य केले.

मोठी बातमी! इराणचे सैन्य अमेरिकेच्या नियंत्रणाखाली, अमेरिकेचा युद्धात विजय? डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट दावा..
Donald Trump
| Updated on: Apr 02, 2026 | 7:52 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धाला एक महिना पूर्ण होऊन गेला. यादरम्यानच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला संबोधित करत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक दावे केले. डोनाल्ड ट्रम्प यादरम्यान नक्की काय बोलतात याकडे जगाच्या नजरा होत्या. युद्ध संपल्याची डोनाल्ड ट्रम्प घोषणा करू शकतात, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, त्यांनी वेगळीच दावे केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणचे सर्व महत्वाचे नेते मारले गेले आहे. त्यांचे लष्करी अधिकारी देखील मारले गेले. इराणचे सैन्य सध्याच्या स्थितीला अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. खरोखरच इराणचे सैन्य अमेरिकेच्या नियंत्रणात आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

मात्र, पुढील बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही पुढच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये मोठा हल्ला इराणवर करू. युद्ध संपण्याच्या अगदी जवळ आहे. या युद्धात आम्ही विजय मिळवू. जगाने यापूर्वी असे युद्ध कधीच बघितले नव्हते. मुळात म्हणजे आम्हाला जे काही हवे होते ते या युद्धात अगोदरच मिळाले आहे. आम्हाला कोणत्याही स्थितीमध्ये इराणला अणुबॉम्ब तयार करण्यापासून रोखायचे होते आणि आम्ही ते केले.

यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आखाती देशांना वाऱ्यावर सोडून ते जाणार नाहीत. इराण आणि अमेरिका युद्धात आखाती देशांचे मोठे नुकसान झाले. इराणकडून थेटपणे हल्ले केली गेली. या पत्रकार परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक धक्कादायक दावे केले. आता या दाव्यांना इराण नक्की काय उत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाच्या आपण अत्यंत जवळ असल्याचे म्हटले. पण दुसरीकडे इराण युद्धातून माघार घेण्यास तयार नाही. इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या. मोठा हल्ला करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. पुढील काही दिवसात मोठे हल्ले करणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. जग डोनाल्ड ट्रम्प युद्धबंदीची घोषणा करेल म्हणून त्यांच्याकडे आशेने बघत असताना त्यांनी काही वेगळीच दावे केली.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा