AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक मला राजा म्हणतात… इराण युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोसह जगाचे कान टोचले, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध काही थांबत नाहीये. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भाष्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेटपणे अत्यंत मोठे संकेत देण्यात आली.

लोक मला राजा म्हणतात... इराण युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोसह जगाचे कान टोचले, थेट..
Donald Trump
| Updated on: Apr 03, 2026 | 10:46 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. इराण युद्धात एकही देश मदतीला येत नसल्याचे दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अधिक आक्रमक झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीला अमेरिकेपासून चार हात दूर राहण्यातच फायदा असल्याचे अनेक देशांच्या लक्षात आहे. इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही देशाला मदत मागताना दिसत आहेत. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे येत नाही. नाटो देशांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करणे सोडले. नाटो देशांना वेळेला मदत केली पण आपल्या मदतीला कोणीच धावून येत नसल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवले. अमेरिकेचे लष्कर जगातील सर्वात शक्तीशाली लष्कर आहे, अशी आठवण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा पुन्हा करून दिली जात आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका विशेष इस्टर स्नेहभोजनादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक असे भाषण दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे भाषण जगातील मोठा मुद्दा बनले आहे. या भाषणात त्यांनी काही मोठे दावे केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पत्रकारांना आतमध्ये प्रवेश नव्हता. यावेळी ट्रम्प यांनी 40 मिनिटे आपल्या शैलीत भाषण केले. डोनाल्ड ट्रम्प  यांनी म्हटले की, पाम संडेच्या दिवशी, येशू राजा म्हणून जेरुसलेमला आले… लोक मलाही राजा म्हणतात, यावर तुमचे काय म्हणणे आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांच्या नो किंग्स आंदोलनावर टोला लगावला. यासोबतच नाटो देशांकडेही आपला मोर्चा वळवत त्यांनी टीका केली. पुढे त्यांनी म्हटले की, मी काही तेवढा मोठा राजा नाही, मला तर एक बॉलरूम बांधायची परवानगीसुद्धा मिळत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, जे माझ्यासोबत चांगला राहतो, त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत लढतो. मग तो कसाही असो.

पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, एक महान देश होण्याकरिता धर्माची गरज असते. देवाची गरज असते. इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतून विरोध होताना दिसला. अमेरिकी लोकांना डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्धाचा निर्णय फार काही आवडला नाही. लोक रस्त्यावर येऊन विरोध करतानाही दिसले.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा