AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट भारताला मोठा दणका, तब्बल 126 टक्के टॅरिफ…

टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात बघायला मिळाली. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. पण व्यापार करारादरम्यान हा टॅरिफ काढण्यात आला. मात्र, आता पुन्हा एकदा मोठा धक्का अमेरिकेने भारताला दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट भारताला मोठा दणका, तब्बल 126 टक्के टॅरिफ...
Donald Trump
| Updated on: Feb 25, 2026 | 10:44 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत टॅरिफ आकारताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला बेकायदेशीर असल्याचे अमेरिकेच्या कोर्टाने म्हटले. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प माघार घेत नाहीत. कोर्टाचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेल्यानंतरही त्यांनी जगातील सर्वच देशांवर 15 टक्के टॅरिफ आकारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले. मात्र, त्याचा राग त्यांनी इतर देशांवर काढला. भारतावर काही दिवसांपूर्वीच मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. व्यापार करारदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी केला. पण भारतावर आता अतिरिक्त 15 टक्के टॅरिफ लागणार की नाही? याबद्दल भूमिका स्पष्ट केली नाही. भारतावर टांगती तलवार कायम आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेतला. ज्याने व्यापार करारादरम्यानच भारताला मोठा धक्का बसला. भारताला ज्याची भीतीच होती तेच घडल्याचे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या सोलर पॅनेलवर 126 टक्के टॅरिफ लावण्याची धक्कादायक घोषणा केली. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे म्हणणे आहे की, भारत सरकारकडून उत्पादकांना चुकीच्या पद्धतीने आर्थिक मदत केली जात आहेत. ज्यामुळे अमेरिकी कंपन्यांचे नुकसान होत आहे. हा भारतीय सोलर कंपन्यांसाठी अत्यंत मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

ब्लूमबर्दच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय सोलर कंपन्यांना अमेरिकेच्या बाजारात पोहोचणे आता कठीण झालंय. 2024 मध्ये भारताने अमेरिकेत 792.6 मिलियन डॉलर सोलर पॅनेल अमेरिकेत निर्यात केले होते. मात्र, आता थेट फटका बसणार. अमेरिकेमध्ये भारतीय सोलरची मागणी जास्त आहे, पण आता सोलर पॅनेलवर 126 टॅरिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्याने भारतातून अमेरिकेत सोलर पॅनेल पाठवणे जवळपास अशक्यच आहे.

भारत आणि अमेरिकेत व्यापार करार झाले असून त्याची घोषणा करणे शिल्लक आहे. काही गोष्टींवर काम सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच अमेरिकेकडून भारताला अत्यंत मोठा झटका हा भारताला दिला आहे. इतक्या मोठ्या टॅरिफनंतर भारत नक्की काय प्रतिक्रिया देतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ