AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प करू कोणत्याही क्षणी शकतात मोठी घोषणा, इराण अमेरिका युद्धात थेट गुडन्यूज, अखेर युद्ध..

US-Iran War : इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहे. इराण आणि अमेरिकेकडून काही अटी ठेवण्यात आल्यात. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी अटी मान्य करण्यात आल्यात. डोनाल्ड ट्रम्प मोठी घोषणा करू शकतात.

डोनाल्ड ट्रम्प करू कोणत्याही क्षणी शकतात मोठी घोषणा, इराण अमेरिका युद्धात थेट गुडन्यूज, अखेर युद्ध..
Donald Trump
| Updated on: May 29, 2026 | 8:11 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात गेल्या 60 दिवसांपासून होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग जैरीस आले. यादरम्यानच आता आनंदाची बातमी पुढे येत आहे. होर्मुज खाडी अखेर 60 दिवसांनंतर उघडण्याकरिता तयार आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यांवर महत्वाची चर्चा झाली. ज्यात सर्वात महत्वाचे म्हणजे होर्मुज खाडीबद्दल आहे. इराण आणि अमेरिका वाटाघाटीत काही मुद्द्यात तयार आहेत. इराण होर्मुज खाडीत टोल आकारू शकत नाही, असेही अमेरिकेने स्पष्ट केले. त्याकरिताही इराणने सहमती दर्शवली आहे. इराणला 30 दिवसांच्या आत या जलमार्गात पेरलेले सर्व सुरुंग काढून टाकणे देखील बंधनकारक असेल. या करारानुसार, इराणच्या तेलावरील निर्बंध अमेरिकेला काढणार आहे. करारामध्ये इराणने अण्वस्त्रे विकसित करू नयेत, या अटीचाही समावेश आहे.

युद्धविरामाच्या काळात, तेहरानचे संवर्धित युरेनियम कसे नष्ट करायचे, हे दोन्ही पक्ष ठरवतील. इराणचा गोठवलेला निधी सोडण्याचा मुद्दाही या वाटाघाटींमध्ये समाविष्ट आहे. अमेरिकेने इराणचा निधी गोठवलेला आहे, ते निर्बंध देखील अमेरिकेला हटवावी लागणार आहे. करार जवळपास फायनल असून कोणत्याही क्षणी युद्धविरामाची घोषणा दोन्ही देश मिळून करतील.

अॅक्सिऑसने एका अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रस्तावित सामंजस्य कराराबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप या कराराला मंजुरी दिली नाही. पण पूर्णपणे शक्यता आहे की, डोनाल्ड ट्रम्प या कराराला ग्रीन सिग्नल देऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, या करारावर विचार करण्याकरिता मला काही दिवसांचा वेळ हवा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने ठेवलेल्या जवळपास अटी इराणकडून मंजूर करण्यात आल्यात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणत्याही क्षणी या कराराला मंजूरी मिळू शकते. इराण आणि अमेरिका युद्धविरामाच्या अत्यंत जवळ असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे की, याबाबत डोनाल्ड ट्रम्प नक्की काय घोषणा करतात. डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, युद्धविरामाच्या अत्यंत जवळ आम्ही आहोत.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला