AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली

Donald Trump : भारतासह संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवण्याची घोषणा केली आहे.

अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली
Trump hormuzImage Credit source: Google
| Updated on: Apr 15, 2026 | 7:07 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता भारतासह संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवण्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘आता आम्ही होर्मुझ पूर्णपणे खुले करत आहोत. याबाबत आमची चीनशी चर्चा झाली आहे. चीन इराणला शस्त्रे देणार नाही, त्यामुळे आम्ही ते कायमचे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.’ ट्रंप यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा होर्मुजमधील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अपयशी ठरल्याची बातमी समोर आली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ‘आता कधीही होर्मुज बंद होण्याची वेळ येणार नाही. हे सर्व देशांसाठी खुले झाले आहे. यामुळे मी खूप आनंदी आहे.’ युद्धविरामाच्या काळात अलीकडेच अशी बातमी आली होती की चीनने इराणला काही शस्त्रे पाठवली आहेत. यावर बोलताना ट्रंप यांनी म्हटले की, मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून शस्त्रे न देण्याची विनंती केली होती, आणि चीनने ती मान्य केली आहे. मी जेव्हा चीनला जाईन, तेव्हा जिनपिंग मला मिठी मारतील. आमचे संबंध चांगले आहेत.’

ट्रंप यांनी नाकेबंदी हटवण्यामागील कारणे

  • वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार, होर्मुजच्या बाहेर अमेरिकेची नाकेबंदी अपयशी ठरली. नाकेबंदीच्या पहिल्याच दिवशी सुमारे 20 जहाजे होर्मुजमधून गेली आणि अमेरिकन सैन्य त्यांना थांबवू शकले नाही. यातील बहुतांश जहाजे चीनची होती, आणि त्यांना थांबवणे अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकले असते, कारण चीननेही त्यांना कठोर इशारा दिला होता.
  • ब्रिटन आणि फ्रान्ससारखे देश होर्मुजच्या मुद्द्यावर सक्रिय झाले होते. फ्रान्सचे म्हणणे होते की युद्धात सहभागी देशांनी होर्मुजपासून दूर राहावे. युद्ध करणारे देश संपूर्ण जगाला त्रास देऊ शकत नाहीत. ब्रिटन आणि फ्रान्स यासाठी व्यापक आघाडी तयार करत होते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली.
  • अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये या आठवड्याच्या शेवटी शांतता कराराबाबत बैठक प्रस्तावित आहे. या बैठकीपूर्वी होर्मुजमध्ये अमेरिकेची प्रतिमा खराब झाली असती, तर वाटाघाटींमध्ये ट्रंप यांची टीम कमकुवत पडली असती. त्यामुळे चर्चेपूर्वीच ट्रंप यांनी हा निर्णय घेतला.
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...