AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणवरील हल्ल्यावरुन डोनाल्ड ट्रम्प संभ्रमात? हल्ल्याच्या आदेशाचा निर्णय पुढे ढकलला

अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी कारवाई करावी की नाही? हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात ठरवणार आहेत. नजीकच्या भविष्यात इराणशी वाटाघाटी होण्याची किंवा न होण्याची शक्यता आहे. त्या आधारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात निर्णय घेतील.

इराणवरील हल्ल्यावरुन डोनाल्ड ट्रम्प संभ्रमात? हल्ल्याच्या आदेशाचा निर्णय पुढे ढकलला
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 20, 2025 | 7:57 AM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेची एन्ट्री होणार होती. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल झाला आहे. इराणवर हल्ला करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प संभ्रामात आहेत. हल्ल्याच्या अंतिम आदेशाचा निर्णय दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की, अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी कारवाई करावी की नाही? हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात ठरवणार आहेत. दरम्यान, इराण आणि इस्त्रायल युद्ध आठव्या दिवशीही सुरु होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर भीषण हल्ले केले.

व्हाईट हाऊसने काय म्हटले?

व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदेश शेअर केला. त्यांनी म्हटले की, नजीकच्या भविष्यात इराणशी वाटाघाटी होण्याची किंवा न होण्याची शक्यता आहे. त्या आधारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात निर्णय घेतील. ट्रम्प नेहमीच राजनैतिक तोडग्याच्या बाजूने असतात. ते शांततेचे पुरस्कर्ते आहेत. जर राजनैतिक भूमिकेची शक्यता असेल तर ते निश्चितच स्वीकारतील.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

यापूर्वी माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, मी हल्ला करेन किंवा करणार नाही. त्यासाठी पुढचा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. कदाचित त्यापेक्षा कमी वेळेत हा निर्णय घेतला जाईल. डोनाल्ड ट्रम्प इराणला वेळ देत आहे. इराणाने अण्वस्त्र निर्मितीची भूमिका सोडली तर अमेरिका हल्ला करणार नाही. परंतु इराणकडून अमेरिकेच्या अटी मान्य झाल्या नाही तर पुढील दोन आठवड्यात ट्रम्प इराण-इस्त्रायल युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेणार आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणला शरण येण्याचे म्हटले होते. त्याच्या उत्तरात खोमेनेई यांनी अमेरिका या युद्धात उतरल्यास त्यांना त्याची भरपाई मोजावी लागणार आहे. अमेरिका या युद्धात उतरण्याच्या तयारीत असताना रशियानेही अमेरिकेला इशारा दिला आहे. रशियाने म्हटले की, या युद्धात अमेरिका उतरल्यास त्यांच्यासाठी ते सर्वात धोकादायक पाऊल ठरणार आहे.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट;
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट