पाकिस्तानसाठी गाढव सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, या देशाला विकून करतोय घसघशीत कमाई

चीन पाकिस्तानकडून मोठ्या संख्येने गाढवांची खरेदी करत आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न पाकिस्तानमधील लोक आणि सरकारला मिळत आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या गाढवांच्या व्यापाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पाकिस्तानसाठी गाढव सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, या देशाला विकून करतोय घसघशीत कमाई
पाकिस्तानसाठी गाढव सोन्याचे अंडे देणारी कोंबडी
| Updated on: Jun 14, 2025 | 11:37 AM

पाकिस्तानसाठी गाढव सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत आहे. पाकिस्तानातील गाढवांची किंमत घोड्यांपेक्षाही जास्त झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील अनेक जण गाढवांचा व्यापार करत आहे. पाकिस्तानमधील लाखो जणांचे कुटुंब या गाढवांचा व्यापारावर सुरु आहे. ही गाढवे फक्त पाकिस्तानमधील जनतेलाच नाही तर पाकिस्तान सरकारसाठीही फायदेशीर ठरत आहे. पाकिस्तान सरकार दुसऱ्या देशांना गाढव विकून चांगली कमाई करत आहे.

चीनकडून मोठ्या संख्येने खरेदी

पाकिस्तानात पूर्वी गाढव ३० हजार रुपयांना मिळत होते. आता त्याची किंमत वाढली आहे. विशिष्ट जातीच्या गाढवांची किंमत लाखांमध्ये गेली आहे. अनेक भागांत गाढव दोन लाख रुपयांनाही मिळत आहे. पाकिस्तानात गाढवांची किंमत वाढण्यामागे चीनचा हात आहे. चीन पाकिस्तानकडून मोठ्या संख्येने गाढवांची खरेदी करत आहे. चीनमध्ये गाढवाच्या त्वचेपासून एक विशेष प्रकारचे औषध बनवले जाते. त्याला एजियाओ म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एजियाओ शक्ती वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, ट्यूमर आणि अशक्तपणावर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे. यामुळे चीन पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ते खरेदी करतो. त्यानंतर त्या गाढवांना मारुन त्यापासून औषधाची निर्मिती करत आहे.

पाकिस्तामधील जवळपास ६० लाख लोक गाढवांचा व्यापार करत आहे. पाकिस्तान दरवर्षी हजारो गाढवांची निर्यात करतो. त्यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न पाकिस्तानमधील लोक आणि सरकारला मिळत आहे. पाकिस्तानला गाढवाच्या निर्यातीमधून किती रुपये मिळत आहे, त्याची स्पष्ट माहिती नाही. परंतु एका अंदाजानुसार १०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न पाकिस्तानला गाढवांचा माध्यमातून मिळत आहे.

पाकिस्तानकडून होणाऱ्या गाढवांच्या व्यापाराची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पाकिस्तानला ट्रोलही केले जात आहे. काही जण म्हणतात, अनेक देश तंत्रज्ञान विकून पैसा कमवतो, परंतु पाकिस्तान गाढव विकून पैसे कमवत आहे. परंतु पाकिस्तानसाठी गाढव सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे.