AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांचं नाव सांगतात अन्…, युद्धामुळे विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांसोबत मोठा स्कॅम, नेमकं काय घडलं?

इराण-इस्रायल युद्धामुळे दुबईत अडकलेल्या प्रवाशांना दुबई पोलिसांच्या नावाने गंडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी दुबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती जारी केली आहे.

पोलिसांचं नाव सांगतात अन्..., युद्धामुळे विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांसोबत मोठा स्कॅम, नेमकं काय घडलं?
Dubai Police
| Updated on: Mar 02, 2026 | 8:19 AM
Share

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. सध्या दुबई पोलिसांच्या नावाने अनेक प्रवाशांची फसवणूक करण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेक प्रवाशांना दुबई पोलीस असल्याचे भासवून त्यांची वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

कशी होते फसवणूक?

युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. यामुळे दुबई विमानतळावर लाखो प्रवासी अडकले आहेत. या अडकलेल्या प्रवाशांना मदतीची गरज असतानाच काही भामटे दुबई क्रायसिस मॅनेजमेंट विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांशी संपर्क साधत आहेत. हे फसवणूक करणारे आपण दुबई पोलिसांशी संबंधित असल्याचे सांगतात. यावेळी प्रवाशांना मदतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून यूएई पास (UAE PASS) आणि एमिरेट्स आयडी (EID) सारखी अत्यंत संवेदनशील माहिती मागितली जात आहे.

जर एखाद्या प्रवाशाने आपली डिजिटल ओळख शेअर केली, तर मग हे गुन्हेगार लगेचच प्रवाशाच्या नावावर असलेले सिम कार्ड क्लोन करतात किंवा नवीन मिळवतात. त्यांच्या मोबाईल नंबरचा ताबा मिळाल्यावर, ते संबंधित व्यक्तीच्या बँकिंग ॲप्समध्ये प्रवेश मिळवतात. यानंतर ओटीपी (OTP) द्वारे खात्यातील सर्व पैसे लंपास करतात, अशी यांची कार्यपद्धती आहे.

या प्रकारांची गंभीर दखल घेत दुबई पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. दुबई पोलीस किंवा कोणताही सरकारी विभाग फोन किंवा मेसेजद्वारे कधीही ओटीपी (OTP) किंवा गोपनीय बँक माहिती मागत नाही. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली डिजिटल ओळख किंवा एमिरेट्स आयडीची माहिती देऊ नका. संशयास्पद फोन आल्यास तातडीने अधिकृत क्रमांक ९०१ वर संपर्क साधा किंवा त्यांच्या ‘eCrime’ प्लॅटफॉर्मवर तक्रार नोंदवा, असे आवाहन दुबई पोलिसांनी दिले आहे.

दरम्यान शनिवारी इराणने केलेल्या हल्ल्यांनंतर सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे रद्द केली आहेत. दोन दिवस उलटूनही परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. यामुळे हजारो नागरिक विमानतळावर अडकले असून, याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. प्रवाशांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत स्रोतांकडून येणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...