AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांभाळून वापरा एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेल, जगात खळबळ उडवणारा खुलासा, थेट युएई..

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असतानाच आता मोठी माहिती पुढे येत आहे. ज्याने जगाची चांगलीच झोप उडाल्याचे बघायला मिळतं. या धक्कादायक माहितीने होर्मुज खाडी आणि कच्चे तेल याचे संकट कायम राहणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

सांभाळून वापरा एलपीजी गॅस आणि पेट्रोल डिझेल, जगात खळबळ उडवणारा खुलासा, थेट युएई..
Strait of Hormuz
| Updated on: May 22, 2026 | 12:38 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युद्ध लवकरच थांबेल असे सांगितले जात आहे. मात्र, दोन्ही देश काही गोष्टींवर आढल्याचे बघायला मिळतंय. स्थिती अधिक चिंताजनक झाली. जागतिक बाजारात तणाव आहे. कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. जागतिक स्तरावर ऊर्जा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेल आणि वायूने ​​भरलेल्या जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेकडे आता बघितले जात आहे. मात्र, यादरम्यानच मोठी धोक्याची घंटा पुढे येतंय. संयुक्त अरब अमिरातीमधील एका प्रमुख सरकारी तेल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने असा अंदाज वर्तवला आहे की, जरी आता इराण आणि अमेरिका युद्ध थांबले तरीही होर्मुज खाडीच्या माध्यमातून तेलाचा पुरवठा करण्याकरिता 2027 उजडू शकते किंवा त्यापेक्षाही अधिक काळ लागू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय तर संघर्ष जरी 2026 मध्ये संपला तरीही होर्मुज खाडी सुरक्षित होण्याकरिता साधारणपणे एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे.

पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. तेल आणि वायू पुरवठ्याच्या संकटाशी आधीच झुंजत असलेल्या जगाकरिता हा अंदाज म्हणजे मोठी चिंता आहे. होर्मुज खाडीत मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तणाव बघायला मिळत आहे. या तणावात जागतिक बाजारात गंभीर स्थिती निर्माण झाली. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सरकारी तेल कंपनी ADNOC चे प्रमुख सुलतान अल जाबेर यांनी मोठे भाष्य केले.

सुलतान अल जाबेर यांनी म्हटले की, जरी हे युद्ध संपले तरीही होर्मुज खाडीत होणारा तेलपुरवठा पूर्णपणे सामान्य होण्याकरिता आपल्याला 2027 च्या पहिल्या किंवा तिसऱ्या महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल. होर्मुज खाडी कच्च्या तेलाची ने-आण करण्याकरिता सर्वात सुरक्षित मानली जात. तिथेच आता मोठा संघर्ष असून ती बंद आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) या संकटाला इतिहासातील सर्वात भीषण ऊर्जा संकट म्हटले. इराणने या होर्मुज खाडीला अतिक्रमणापासून वाचवण्याकरिता धोकादायक बनवले. गुप्तपणे तिथे बॉम्ब सुरंग टाकण्यात आल्यात. ते काढण्याकरिता आणि सर्व स्थिती नियंत्रणाय येण्याकरिता मोठा काळ जाणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ