एकमेकिंना किस करण्याची जबरदस्ती, नकारानंतर बसमध्येच मारहाण

बसमध्ये कुणीही नव्हतं. मागच्या बाजूला मुलांचं टोळकं बसलं होतं. त्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही किस करावा, अशी मागणी त्यांनी केली, असं गेमोनतने म्हटलंय.

एकमेकिंना किस करण्याची जबरदस्ती, नकारानंतर बसमध्येच मारहाण

नवी दिल्ली : ब्रिटनची राजधानी लंडनमधील एका धक्कादायक प्रकारावर जगभरात संताप व्यक्त केला जातोय. विमान कर्मचारी आणि तिच्या गर्लफ्रेंडला बसमध्ये मुलांच्या टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली. आमच्या मनोरंजनासाठी सर्वांसमोर किस करा, अशी मागणी या मुलींकडे टोळक्याकडून करण्यात आली. नकार दिल्यानंतर दोघींना मारहाण करुन टोळक्याने पळ काढला.

30 मे रोडी घडलेली ही घटना आहे, पण याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आलंय. मेलानिया गेमोनत आणि तिची अमेरिकन गर्लफ्रेंड ख्रिस या दोघी उरुग्वेहून वेस्ट हॅम्पस्टेडला जात असताना हा प्रकार घडला. गेमोनतने याबाबत फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिली. आम्ही दोघी डबल डेकर बसने प्रवास करत होतो. बसमध्ये कुणीही नव्हतं. मागच्या बाजूला मुलांचं टोळकं बसलं होतं. त्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही किस करावा, अशी मागणी त्यांनी केली, असं गेमोनतने म्हटलंय.

आम्हा दोघींसोबत या मुलांनी विचित्र पद्धतीने वागणं सुरु केलं. त्यांना पाहता यावं यासाठी किस करण्याची मागणी केली. आम्हाला लेस्बियन म्हणून चिडवलं आणि अश्लील भाषेचा वापर केला, असं गेमोनतने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय. शिवाय नकार दिल्यानंतर दोघींसोबतही अश्लील चाळे करण्यात आले, चालू बसमध्ये मारहाण केली, असंही तक्रारीत म्हटलंय. यामध्ये दोघींनाही मोठी दुखापत झाली आहे.

लंडन पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलांच्या टोळक्याने मुलींसोबत हा प्रकार केल्यानंतर त्यांच्याकडील पैसे घेऊन पळ काढला. ते जवळपास चार जण होते आणि त्यातील एक स्पॅनिश, तर उर्वरित ब्रिटनचे होते, असं गेमोनतने तिच्या तक्रारीत म्हटलंय.

जगभरातून सोशल मीडियावर या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. लंडनचे महापौर सादिक खान यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. लंडनमध्ये LGBT+ समुदायावर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, असंही सादिक खान म्हणाले. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *