AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sheikh Hasina ICT Final Verdict : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हे 5 आरोप ठरले कारणीभूत…

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कोर्टाने थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आली. त्यांच्याविरोधात तब्बल 8, 747 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Sheikh Hasina ICT Final Verdict : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हे 5 आरोप ठरले कारणीभूत...
Sheikh Hasina
| Updated on: Nov 17, 2025 | 3:00 PM
Share

भारताच्या शेजारील देशात मोठा उद्रेक होताना दिसतोय. अगोदर बांगलादेश, श्रीलंका आणि त्यानंतर नेपाळमध्ये उद्रेक झाला आणि हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत जाळपोळ केली. पाकिस्तानमध्ये तर मागील काही वर्षांपासून हाहाकार आहे. सध्या बांगलादेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. माजी पंतप्रधान शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्ज्झमान खान आणि माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांच्याविरुद्ध मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांवर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण निकाल दिला. त्यापूर्वीच शेख हसीना यांनी मोठे विधान केले होते. शेख हसीना यांच्या पक्षाने देश व्यापी संप आज पुकारला आहे. ज्यावेळी बांगलादेशमध्ये उद्रेक सुरू होता, त्यावेळी बांगलादेशमधून पळून शेख हसीना भारतात आल्या आणि मागील काही महिन्यांपासून त्या भारतातच आहेत.

जुलै-ऑगस्ट 2024 च्या भेदभावविरोधी विद्यार्थी चळवळीदरम्यान झालेल्या अशांततेशी संबंधित हे आरोप होती. शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्धचे आरोपपत्र 8, 747 पानांचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात की, शेख हसीना आणि त्यांच्या सरकारवर नेमकी काय आरोप करण्यात आली. शेख हसीना यांच्या मुलाने आईच्या शिक्षेबद्दल अत्यंत मोठे विधान नुकताच केलंय. नुकताच कोर्टाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

विद्यार्थी आणि नागरिकांवर मोठे हल्ले

14 जुलै 2024 रोजी गणभवन येथे हसीनाच्या प्रक्षोभक विधानानंतर परिस्थिती बिघडल्याचा आरोप आहे.  पोलिस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांवर मोठे हल्ले सुरू केले. ज्यानंतर परिस्थिती अधिक बिघडत गेली.

हेलिकॉप्टरने हल्ला, ड्रोन आणि गोळीबार करण्याचे आदेश

शेख हसीना यांच्या विरोधात होणारे निदर्शने थांबवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने हल्ला, ड्रोन आणि गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा मोठा आणि गंभीर आरोप आहे. त्यांचे सहकारी कमाल आणि मामून यांनी हे आदेश लागू करण्याचा आरोप आहे.

अबू सईद यांच्या सूचनेवरून गोळ्या घालून हत्या

शेख हसीना आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांवर 16 जुलै 2024 रोजी बेगम रोकेया विद्यापीठासमोर अबू सईद यांच्या सूचनेवरून गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. हे एक गंभीर आरोप होते.

ढाका येथील सहा विद्यार्थ्यांची हत्या

5 ऑगस्ट 2024 रोजी कायदा अंमलबजावणी दलांच्या कारवाईत सहा विद्यार्थ्यांची हत्या झाली. या कारवाईसाठी तिन्ही आरोपी जबाबदार असल्याचा आरोप आहे.

सहा जणांची हत्या आणि पाच मृतदेह जाळणे

आशुलियामध्ये सहा जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यापैकी पाच जणांचे मृतदेह जाळण्यात आले. सहावा व्यक्ती जिवंत असल्याचे सांगितले जाते, परंतु तोही जाळण्यात आला होता.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.