AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 डिसेंबरपसून भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सामान्य होणार, मात्र नवीन कोविड स्ट्रेनमुळे ‘या’ 14 देशांना वगळलं

काही देशांमध्ये नव्याने कोविडचा उद्रेक झाल्यामुळे, त्या देशांतील उड्डाणे पुन्हा सुरू होणार नाहीत. ज्या 14 देशांमध्ये अद्याप सामान्य आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार नाहीत त्यामध्ये युरोपियन देशांचा आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. पण, या देशांची हवाई सेवा 'एयर बबल' अंतर्गत सध्या आहेत तशा सुरु राहतील, अशी माहिती मिळतेय.

15 डिसेंबरपसून भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सामान्य होणार, मात्र नवीन कोविड स्ट्रेनमुळे 'या' 14 देशांना वगळलं
हाय रिस्क देशातून आलेले आणखी 6 जण कोरोना संक्रमित
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 26, 2021 | 8:14 PM
Share

नवी दिल्लीः अखेर, भारत सरकारने भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख जाहीर केली आहे. विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की 15 डिसेंबर 2021 पासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार सुरू होतील. पण, काही देशांमध्ये नव्याने कोविडचा उद्रेक झाल्यामुळे, त्या देशांतील उड्डाणे पुन्हा सुरू होणार नाहीत. ज्या 14 देशांमध्ये अद्याप सामान्य आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार नाहीत त्यामध्ये युरोपियन देशांचा आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.

14 देशांना यातून वगळण्यात आले आहे

ज्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू होणार नाहीत ते देश आहेत-ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे.

नवीन कोविड स्ट्रेन तसेच या देशांमधील वाढत्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने या 14 देशांना वगळे आहे.

या देशांची हवाई सेवा ‘एयर बबल’ अंतर्गत सध्या आहेत तशा सुरु राहतील, अशी माहिती मिळतेय.

मार्च 2020 पासून, कोविड महामारी सुरू झाल्यानंतर सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती. 2020 च्या अखेरीपासून, वंदे भारत मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत, परंतु ती काही देशांपुरती मर्यादित आहेत. ज्या देशांसोबत भारताने करार केला आहे, त्या देशांमध्ये सध्या मर्यादित उड्डाणे सुरू आहेत. विमान कंपन्यांकडून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची मागणी होत होती कारण ते आर्थिक संकटात असल्याने त्यांनी सरकारला सांगितले होते. सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचीही प्रवाशांची मागणी होती कारण अजूनही अनेक लोक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत.

कोवॅक्सिनला WHO ने मान्यता दिल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा होती. अनेक भारतीय ज्यांनी कोवॅक्सिन घेतले होते, ते आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकत नव्हते.

इतर बातम्या

मोठी बातमी ! फ्रान्स, जर्मनी, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली, पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणीची घोषणा

Covid Updates: यूरोपमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, तिसऱ्या लाटेनं मृत्यूचं तांडव, भारतासाठीही धोक्याची घंटा?

Afghan Girl: हिरव्या डोळ्याच्या ‘त्या’ अफगाण मुलीची तालिबानपासून सुटका, मिळाला या देशात आश्रय

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...