Afghan Girl: हिरव्या डोळ्याच्या ‘त्या’ अफगाण मुलीची तालिबानपासून सुटका, मिळाला या देशात आश्रय

1985 मध्ये जेव्हा तिचा फोटो प्रकाशित झाला तेव्हा शरबत ही एक लहान मुलगी होती. तिच्या हिरव्या रंगाच्या डोळ्यांसाठी ती जगात प्रसिद्ध झाली. पण, नंतर अफगाणिस्तानातील दहशतवादामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

1/7
1985 मध्ये नॅशनल जेरोग्राफी मासिकाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेला शरबत गुलचा फोटो जगप्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर 2002 मध्ये एका आंतरराष्ट्रीय फोटोग्राफरने तिचा शोध घेतला आणि अफगाणिस्तानच्या एका छोट्या गावात शरबत सापडली. त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली.

2/7
शरबत तिच्या कुटुंबासह तालिबानच्या राजवटीत अडकलेल्या करोडो अफगाण कुटुंबांपैकी एक होती. पण आता ती मुक्त आहे कारण आता तीला इटली देशामध्ये आश्रय मिळाला आहे.

3/7
1985 मध्ये जेव्हा तिचा फोटो प्रकाशित झाला तेव्हा शरबत ही एक लहान मुलगी होती. तिच्या हिरव्या रंगाच्या डोळ्यांसाठी ती जगात प्रसिद्ध झाली. पण, नंतर अफगाणिस्तानातील दहशतवादामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक वर्षे ती पाकिस्तानातील निर्वासित छावणीत राहिली. अखेर आता तिला दिलासा मिळाला आहे.

4/7
शरबत गुला अवघ्या 12 वर्षांची होती जेव्हा पाकिस्तानातील एका निर्वासित छावणीतील एका छायाचित्रकाराने तिचा हा फोटो काढला होता. सगळ्या जगाच्या नजरा त्याच्या हिरव्या डोळ्यांवर खिळल्या होत्या. 2016 मध्ये शरबतला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. बनावट ओळखपत्र घेऊन देशात राहिल्याचा आरोप लावला गेला होता. तीला अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आले.

5/7
पंतप्रधान मारियो द्राघी यांच्या कार्यालयाने सांगितले की, शर्बतने इटलीकडे आश्रयाचे आवाहन केले होते. इटालियन सरकार आता त्यांना देशात राहण्यासाठी आवश्यक सुविधा आणि इतर गोष्टी देणार आहे. यासोबतच तीला इटालियन समाजात कसे राहायचे हे देखील समजवण्यात येईल.

6/7
शरबतने कोणतेही शिक्षण घेतलेले नाही, ती निरक्षर आहे. ती आता 49 वर्षांची आहे आणि चार मुलांची आई आहे. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ती अजूनही तिच्या हिरव्या डोळ्यांसाठी आणि तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.

7/7
शरबत गुलला कायम 'ग्रीन आइड अफ़ग़ान गर्ल' म्हणून ओळखली जाते.

Published On - 6:39 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI