AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G20 Summit: पंतप्रधानांच ‘मोदी है भारत का गेहना’ गाण्याने ब्रिटनमध्ये जल्लोषात स्वागत; बघा Video

मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे जमलेल्या भारतीयांनी मोदींच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू केला. मोदींनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय लोकांमधल्या एका लहान मुलाशी संवादही साधला. पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या 26 व्या हवामान बदलावरील जागतिक परिषदेत (United Nation's Conference of Parties (COP26) on Climate Change) सहभागी होणार आहेत.

G20 Summit: पंतप्रधानांच 'मोदी है भारत का गेहना' गाण्याने ब्रिटनमध्ये जल्लोषात स्वागत; बघा Video
PM Modi arriving in Glasglow, UK
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 01, 2021 | 12:19 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ग्लास्गोला, ब्रिटन येथे पोहोचले आणि तिथे मोदींच भारतीयांनी जोरदार स्वागत केलं. ‘मोदी है भारत का गेहना’ गाणं गाऊन सुरेल स्वागत झालं मोदींच. मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच तिथे जमलेल्या भारतीयांनी मोदींच्या स्वागतासाठी जल्लोष सुरू केला. मोदींनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या भारतीय लोकांमधल्या एका लहान मुलाशी संवादही साधला. (G20 Summit COP26 PM Modi welcomed by Indians in Glasglow UK singing song Modi Hai Bharat Ka Gehna)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस- 1 आणि 2 नोव्हेंबरला ग्लासगो, ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटनमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या 26 व्या हवामान बदलावरील जागतिक परिषदेत (United Nation’s Conference of Parties (COP26) on Climate Change) ते सहभागी होणार आहेत. हे G20 शिखर परिषदेचं दुसर सत्र आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.

G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रासाठी मोदी गेले तीन दिवस रोम, इटलीमध्ये होते. रोममधुन निघतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, रोम शिखर परिषदेदरम्यान, महामारीशी लढा, आरोग्य पायाभूत सुविधा सुधारणे, आर्थिक सहकार्याला चालना देणे आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणे यासारख्या जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. COP26 शिखर परिषदेत हवामान बदल कमी करण्यासाठी, या संदर्भात भारताच्या प्रयत्नांना स्पष्ट करण्यासाठी आणि इतर जागतिक नेत्यांसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असं पंतप्रधान मोदीं म्हणाले.

G20 शिखर परिषदेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. जवळजवळ 200 देशांचे प्रमुख या परिषदेत उपस्थित असतील. G20 ब्लॉक मध्ये जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा (Greenhouse gases emissions) अंदाजे 80 टक्के वाटा हा ब्राझील, चीन, भारत, जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स यांचा आहे. चीन आणि युनायटेड स्टेट्स नंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे.

Related News

G20 Summit: पंतप्रधान मोदी रोममध्ये कोणकोणत्या जागतिक नेत्यांना भेटले? काय होते मुद्दे?

VIDEO: नाव काय तुमचं?, इथे काय करता?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद

G20 Summit COP 26 PM Modi welcomed by Indians in Glasglow UK singing song

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप