VIDEO: नाव काय तुमचं?, इथे काय करता?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची एका मराठी माणसाशी भेट झाली आणि मोदींनी त्यांच्याशी चक्क मराठीतून संवाद साधला. (Narendra Modi Speaks Marathi: Narendra Modi speaks in Marathi to a Marathi man in Italy)

VIDEO: नाव काय तुमचं?, इथे काय करता?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद
Narendra Modi


रोम: पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची एका मराठी माणसाशी भेट झाली आणि मोदींनी त्यांच्याशी चक्क मराठीतून संवाद साधला. या व्यक्तीचं नाव आणि व्यवसाय विचारण्यापासून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली. भर गर्दीतच मोदींनी हा संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 परिषदेसाठी इटलीच्या रोममध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी येथील कार्यक्रमांना हजेरी लावली. पियाझा गांधी परिसरात त्यांनी अनेक भारतीयांची भेट घेतली. या गर्दीत त्यांनी नागपूरचे महेंद्र शिरसाट ऊर्फ माही गुरुजींची भेट झाली. प्रचंड गर्दीतून चालणंही मुश्किल होत असताना मोदींनी या माही गुरुजींशी चक्क मराठीतून संवाद साधला.माही गुरुजी गेल्या 22 वर्षांपासून इटलीमध्ये भारतीय योग आणि अध्यात्माचा प्रचार-प्रसार करत आहेत.

काय झाला संवाद?

पंतप्रधान नरेंद्र मोदी: नाव काय तुमचं?
माही गुरुजी: सर, माझं नाव माही. माही गुरुजी म्हणून ओळखतात मला. मी इथे 22 वर्षापासून राहत आहे. सर हे सगळं मी शिकवलं आहे.
मोदी: काय करता तुम्ही?
माही गुरुजी: सर, मी इथे योगा आणि संस्कृत शिकवतो.
मोदी: किती आहेत तुमचे शिष्य?
माही गुरुजी: सर, दोन लाख.
मोदी: दोन लाख… वाह, छान केलंत.
माही गुरुजी: आणि सर माझी एकच अपेक्षा आहे आपल्याकडे.
मोदी: काय आहे?
माही गुरुजी: इथे भारत सरकार आणि इटालीयन सरकारने आयुर्वेदाला परवानगी द्यावी.
मोदी: आयुर्वेद… हो चालेल.

इस्रायलच्या पंतप्रधानांना भेटणार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पुढील आठवड्यात ग्लासगो, स्कॉटलंड येथे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत भेटणार आहेत. बेनेट पंतप्रधान मोदींसह अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत, असं इस्रायल पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार म्हणाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या आठवड्यात इस्रायलच्या भेटीदरम्यान भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत भेटीचे आमंत्रण दिल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांची भेट झाली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला आणि ब्रिटीश क्राउन प्रिन्स चार्ल्स यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभालाही पंतप्रधान बेनेट उपस्थित राहतील, असे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी बेनेट यांना दिलेल्या निमंत्रणामुळे इस्रायलमध्ये (India Israel Current Relations) खूप चर्चा झाली. यावरून भारताला इस्रायलच्या नव्या सरकारसोबत काम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे संकेत मिळाले. संबंध पूर्वीसारखेच राहतील. इस्रायलच्या भेटीदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, भारत आणि इस्रायलमधील संबंध इतक्या उंचीवर पोहोचले आहेत की ते आता “व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि नापसंतीच्या पलीकडे गेले आहेत”.

संबंधित बातम्या:

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

Leander Paes: टेनिस स्टार लिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Russia Nuclear Bomb: या दिवशी रुसने केले होते जगातल्या सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र बॉम्बचे परीक्षण; काय आहे ‘जार बॉम्बा’?

(Narendra Modi Speaks Marathi: Narendra Modi speaks in Marathi to a Marathi man in Italy)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI