Iran US War Update : सगळं जग ज्याची वाट पहात होतं ती गुड न्यूज आलीच ! अखेर इराण-अमेरिका युद्ध.. रातोरात काय घडलं?

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी कारवाई दोन आठवड्यांसाठी थांबवण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या या युद्धविरामामुळे आता राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही देशांनी शांततेसाठी सहमती दर्शवली असून, जागतिक तणाव कमी होण्याची आशा आहे. पुढील चर्चा पाकिस्तानात होणार आहे.

Iran US War Update :  सगळं जग ज्याची वाट पहात होतं ती गुड न्यूज आलीच ! अखेर इराण-अमेरिका युद्ध.. रातोरात काय घडलं?
ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाई तूर्त थांबवली
| Updated on: Apr 08, 2026 | 7:45 AM

गेल्या महिन्याभपारेक्षा अधिक काळ युद्धाचं सावट जगावर घोंगवतंय, अणेरिका-इस्रायलने इरणावरव हल्ला चढवल्यावर युद्धाला तोंड फुटलं आणि त्यांच्यासह जगभरातील अनेक देश होरपळले. जागतिक तणावही वाढला. मात्र आता जगासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्यापुरती लष्करी कारवाई थांबवण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. युद्धात आक्रमक भूमिका घेतलेल्या अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती दर्शवली असून, इस्रायलनेही हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी लागू राहील. पाकिस्तानमध्ये यापुढील चर्चा होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत युद्धविरामाची माहिती दिली. “मी दोन आठवड्यांसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले स्थगित करण्यास सहमत आहे,” असे म्हणत त्यांनी हे सर्वसमावेशक युद्धविरामाच्या दिशेने एक पाऊल असल्याचेही नमूद केलं.

पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं. नियोजित हल्ले स्थगित करण्याची विनंती पाकिस्तानने केली होती. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडले तरच, या अटीवरच हे हल्ले स्थगित केले जातील, तणाव कमी करण्यासाठी एक आवश्यक असंही ट्रम्प म्हणाले.

“हा द्विपक्षीय युद्धविराम असेल, म्हणजेच दोन्ही बाजूंनी दोन आठवड्यांच्या कालावधीत माघार घेणे अपेक्षित आहे.” असंही ट्रम्प यांनी लिहीलं. ट्रम्प यांनी असाही दावा केला की लष्करी उद्दिष्टे आधीच साध्य झाली आहेत आणि तेहरानसोबतच्या वाटाघाटी निर्णायक वळणावर आहेत. “आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्टे साध्य केली आहेत, किंबहुना ती ओलांडलीही आहेत, आणि आम्ही दीर्घकालीन शांततेसाठी एका ठोस कराराच्या दिशेने वाटचाल करत आहोत,” असं ट्रम्प यांनी लिहीलं आहे. ” इराणकडून अमेरिकेला 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे, हा प्रस्ताव म्हणजे वाटाघाटींसाठी एक व्यावहारिक आधार म्हटता येईल. ट्रम्प यांच्या मते, बहुतेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधीच सहमती झाली आहे.”

 

दोन आठवड्यांच्या युद्धविरामाने मिळेल मदत

दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीमुळे दोन्ही बाजूंना करार अंतिम करण्याची संधी मिळेल आणि हा दीर्घकाळ चाललेला संघर्ष आता तोडगा निघण्याच्या जवळ आला आहे, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले.

ट्रम्प यांनी ठरवलेल्या अंतिम मुदतीच्या काही मिनिटे आधीच युद्धविरामाची ही घोषणा केली. काल रात्री, ट्रम्प यांनी इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या विधानाकडे अणुहल्ल्याची धमकी म्हणून पाहिले जात होतं. एवढंच नव्हे खुद्द ट्रम्प यांच्या देशातून, अमेरिकेतही या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तथापि, परिस्थितीतील या अचानक बदलामुळे, युद्धविरामामुळे जगाला दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पाकिस्तानमध्ये होणारी ही चर्चा कशी पुढे जाते आणि अमेरिका व इराण कोणत्या मुद्यांवर सहमत पोहोचू शकतात, हे पाहण महत्वाचं ठरेल.

 

Follow Us