AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

F-35 Shot Down : जे फायटर जेट रडारलाच दिसत नाही ते पाडलं कसं? इराण युद्धामुळे समजली F-35 पाडण्याची टेक्निक का?

F-35 Shot Down : इराणने 15 दिवसाच्या आता अमेरिकेची दोन F-35 फायटर जेट्स पाडल्याचा दावा केला आहे. आता दुसरं विमान पाडल्याचा दावा करताना इराणने विमानाच्या ढिगाऱ्याचे फोटो दाखवले आहेत. इराणला हे कसं शक्य होतय जाणून घ्या.

F-35 Shot Down : जे फायटर जेट रडारलाच दिसत नाही ते पाडलं कसं? इराण युद्धामुळे समजली F-35 पाडण्याची टेक्निक का?
F-35
| Updated on: Apr 03, 2026 | 3:30 PM
Share

इराणने आज अमेरिकेचं अत्याधुनिक F-35 फायटर जेट पाडल्याचा दावा केला. हे जगातलं सर्वात प्रगत आणि महागडं विमान आहे. रडारला न दिसणं हे या विमानाचं वैशिष्ट्य आहे. पण इराणने हे आज दुसऱ्यांदा अत्याधुनिक F-35 विमान पाडण्याचा दावा केला आहे. F-35 हे पाचव्या पिढीचं स्टेल्थ फायटर जेट आहे. या एका विमानाची किंमत 1200 कोटीच्या घरात आहे. हे विमान इराण जर पाडत असेल तर तो अमेरिकेच्या डिफेन्स इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का आहे. हे विमान म्हणजे अमेरिकेचा अहंकार आहे. कारण संपूर्ण जगात कुठल्याही देशाकडे F-35 च्या तोडीचं फायटर विमान नाहीय. त्यामुळे या विमानाला एका साध्या सोप्या पद्धतीने खाली पाडणं इराणसाठी एक मोठी बाब आहे. इराणला हे कसं शक्य होतय? जाणून घ्या.

तेहरानमध्ये F-35 हवाई हल्ल्यासाठी उड्डाणवस्थेत असतानाच त्यावर अचूक हल्ला करुन ते पाडण्यात आलं, असं फारस न्यूज एजन्सीने म्हटलं आहे. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डने या बद्दल जास्त भाष्य केलेलं नाही. याआधी 19 मार्चला एका ऑपरेशनमध्ये इराणने F-35 वर हल्ला केलेला. त्यामध्ये विमानाचं नुकसान झाल्याने इमर्जन्सी लँडिंग कराव लागलेलं.

इराणने हा कारनामा केला कसा?

एका चिनी इंजिनिअरच्या सल्ल्याची अमलबजावणी करुन इराणने F-35 पाडल्याचा साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दावा केलाय. चीनच्या एका इंजिनिअरने नुकताच एक व्हिडिओ बनवलेला. त्यात त्याने F-35 ला कसं पाडता येऊ शकतं या बद्दल विश्लेषण केलेलं. हा व्हिडिओ फारसी सबटायटल्सने बनवण्यात आला आहे.

इन्फ्रारेड मिसाइल, मोबाइल लॉन्चर आणि तात्काळ सेंसर सारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या कमी खर्चाच्या शस्त्रांनी एफ-35 पाडता येऊ शकतं असं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 कोटी लोकांनी पाहिला असून इराणमध्ये व्हायरल होत आहे.

इराणने F-35 वर फायरिंग केली. त्यात फायटर जेटचं संतुलन बिघडलं. त्यामुळे विमानाची इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. असं सीएनएनने अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या हवाल्याने एका गोपनीय रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. अमेरिकन सरकारने अधिकृतपणे हे मान्य केलं नाही.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा