Explainer: इराणकडे युद्ध लढायला कुठून येतोय पैसा ? अमेरिकेला कशी काय देतोय टक्कर ?
इराणवर अमेरिकेने हल्ला केला त्याला आता महिन्याहून अधिक काळ लोटाला आहे. अमेरिकेला इराणचा लागलीच पाडाव होईल असे वाटले होते.परंतू असे काही घडलेले नाही. इराणवर दशकांहून अधिक काळ आर्थिक निर्बंध आहेत.तरी इराण अमेरिकेला कशी काय टक्कर देत आहे. त्याला पैसा कोठुन मिळत आहे ?

Iran vs US war: इराणवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे हल्ला करुन महिना उलटून गेला आहे. जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक शक्ती असलेल्या अमेरिकेवर इराणवर आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. तरीही इराण मोठ्या धैर्याने लढत आहे. एखादा अन्य देश असताना तर लागलीच त्याची अवस्था व्हेनेझुएला सारखी झाली असती. दशकांहून अधिक काळ लावलेल्या आर्थिक निर्बंधांना झेलूनही इराण न केवळ टीकून आहे, तर अमेरिकेशी थेट टक्कर घेत आहे. इराणकडे इतका पैसा कुठून येत आहे ? इराणच्या गुप्त कमाईचे रहस्य काय ? पाच मुद्यांमध्ये समजून घेऊयात… अमेरिका आणि इस्रायलसारख्या आधुनिक शस्रास्रांनी सुसज्ज असलेल्या देशांचा इराण सामना करत आहे. या युद्धाला ३७ दिवस झाले आहेत, परंतू इराण काही हार मानायला तयार नाही. तर दुसरीकडे अमेरिकेत महागाई पासून आर्थिक बोझा खूपच वाढला आहे. पेंटागनचा इराण सोबत असलेला तणाव आणि संभाव्य युद्धासाठी २०० अब्ज डॉलरहून अधिक रक्कम मागितली आहे.कारण युद्धाने अमेरिकेच्या तिजोरीवर मोठा ताण आला आहे. दुसरीकडे इराण...