West Asia tensions: मोठी बातमी! ‘या’ 40 उत्पादनांवरील Customs Duty हटवली, यादीच वाचा
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गुरुवारी (2 एप्रिल) प्लास्टिक, औषधे आणि पेट्रोकेमिकल्ससह 40 वस्तूंच्या आयातीवरील सीमा शुल्क हटवले. याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला 1 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धामुळे जगभरात महागाईचा धोका वाढला आहे. दरम्यान, भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोकेमिकल उत्पादनांसह 40 उत्पादनांवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणे आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत जोरदार वाढ लक्षात घेता देशातील वस्तूंचा तुटवडा आणि महागाई रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही सूट 30 जूनपर्यंत लागू राहणार आहे.
‘या’ उत्पादनांवर सवलत
सरकारने सीमा शुल्क हटविलेल्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने नॅहायड्रस, अमोनिया, मिथेनॉल, टोल्यून, स्टायरीन आणि विनाइल क्लोराईड मोनोमर्स यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादनात वापरल्या जाणार् या पॉलिथिलीन आणि पॉलीप्रोपाइलीन सारख्या श्रेणींनाही सूट देण्यात आली आहे. यासह, फार्मास्युटिकल्स आणि ऑटोमोटिव्ह पार्ट्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्या इपॉक्सी रेजिन, पॉलीयुरेथेन आणि फॉर्मल्डिहाइड डेरिव्हेटिव्ह्जचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातही कपात
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला चढविला, त्यानंतर संघर्ष सुरू झाला. या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती सुमारे 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग मध्यपूर्वेतून आयात करतो. अशा परिस्थितीत त्याच्यासाठी ही चिंताजनक परिस्थिती होती. हा दबाव कमी करण्यासाठी सरकारने गेल्या आठवड्यातही काही मोठे निर्णय घेतले होते. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सध्या पेट्रोलवर 3 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आहे, तर डिझेलवर ते मुक्त ठेवण्यात आले आहे.
👉 In a targeted relief, Government grants full customs duty exemption on critical petrochemical products in view of ongoing conflict in West Asia
👉 Exemption will benefit sectors dependent on petrochemical feedstock and intermediates such as plastics, packaging, textiles,… pic.twitter.com/C0gp2AfDvf
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 2, 2026
१. महत्त्वाचे गॅस आणि रसायने (Gases & Basic Chemicals)
१. Methanol (मेथॅनॉल)
२. Anhydrous Ammonia (निर्जल अमोनिया)
३. Styrene (स्टायरीन)
४. Vinyl Acetate Monomer (विनाइल एसीटेट मोनोमर)
५. Acetic Acid (एसेटिक ॲसिड)
६. Phenol (फिनॉल)
७. Toluene (टोल्युइन)
८. Acetone (एसीटोन)
२. प्लास्टिक आणि पॉलिमर्स (Plastics & Polymers)
९. Polypropylene (पॉलीप्रोपायलीन)
१०. Polyvinyl Chloride (PVC) (पीव्हीसी)
११. Polyethylene (PE) (पॉलीइथिलीन)
१२. Polystyrene (पॉलीस्टायरीन)
१३. Polycarbonates (पॉलीकार्बोनेट)
१४. Polyurethanes (पॉलीयुरेथेन)
१५. Polyethylene Terephthalate (PET) (पेट)
१६. Acrylonitrile Butadiene Styrene (ABS) (एबीएस)
१७. Epoxy Resins (इपॉक्सी रेझिन्स)
३. औद्योगिक कच्चा माल (Industrial Raw Materials)
१८. Purified Terephthalic Acid (PTA) (पीटीए)
१९. Mono Ethylene Glycol (MEG) (एमईजी)
२०. Ammonium Nitrate (अमोनियम नायट्रेट)
२१. Ethylene Dichloride (EDC) (इथिलीन डायक्लोराइड)
२२. Caprolactam (कॅप्रोलेक्टम)
२३. Adipic Acid (ॲडिपिक ॲसिड)
२४. Maleic Anhydride (मॅलेइक अनहाइड्राइड)
२५. Phthalic Anhydride (प्थॅलिक अनहाइड्राइड)
२६. Isocyanates (आयसोसायनेट्स)
४. इतर रसायने आणि रबर (Other Chemicals & Rubber)
२७. Polybutadiene (पॉलीब्युटाडाइन)
२८. Ethylbenzene (इथिलबेंझिन)
२९. Propylene Glycol (प्रोपाइलिन ग्लायकोल)
३०. Titanium Dioxide (टायटॅनियम डायऑक्साइड)
३१. Carbon Black (कार्बन ब्लॅक)
३२. Aniline (एनिलिन)
३३. Synthetic Rubber (सिंथेटिक रबर)
३४. Sulphuric Acid (सल्फ्यूरिक ॲसिड)
३५. Hydrochloric Acid (हायड्रोक्लोरिक ॲसिड)
३६. Caustic Soda (कॉस्टिक सोडा)
३७. Soda Ash (सोडा ॲश)
३८. Formaldehyde (फॉर्मल्डिहाइड)
३९. Plasticizers (प्लॅस्टिसायझर्स)
४०. Solvents (विविध सॉल्व्हेंट्स)