AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

43 दिवसानंतर इराण अमेरिका युद्धात थेट घडामोडी, धक्कादायक अहवाल पुढे, जगात खळबळ..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युद्ध अत्यंत घातक स्थितीमध्ये पोहोचले. युद्धबंदी कराराकरिता अमेरिकेने इराणला 48 तासाचा वेळ दिला. यादरम्यान अनेक घडामोड घडताना दिसत आहेत.

43 दिवसानंतर इराण अमेरिका युद्धात थेट घडामोडी, धक्कादायक अहवाल पुढे, जगात खळबळ..
Iran and America
| Updated on: Apr 06, 2026 | 11:44 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. कोणत्याही पद्धतीने युद्ध थांबण्याची मागणी केली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जगाचा दबाव आहे. या युद्धामुळे जगाला देशोधडीला लागण्याची वेळ आली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. किमती काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. शिवाय गॅस आणि कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा आहे. होर्मुज खाडीमध्ये जगातील जवळपास सर्वच देशांचे जहाज अडकून पडली आहेत. होर्मुज खाडी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळ इराणला दिला. यासोबतच युद्धबंदी करार करण्याकरिता 48 तासाचा वेळ अमेरिकेने इराणला दिला आहे. मात्र, इराण अमेरिकेच्या या इशाऱ्याला किती गंभीरपणे घेतो, हे महत्वाचे आहे. कारण यापूर्वी अनेकदा अशाप्रकारची वेळ अमेरिकेकडून इराणला देण्यात आली. पण इराणने कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. सध्याच्या परिस्थितीला अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणा हा अंतिम इशारा असल्याचे म्हटले आहे. इराणमधील तेल प्रकल्प, गॅस प्रकल्प आणि ऊर्जेवर हल्ला करण्याची धमकी इराणकडून देण्यात आली. अमेरिका आणि इराणमध्ये 45 दिवसांपासून वाटाघाटी सुरू आहे. ज्यावेळी युद्ध सुरू झाले, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, युद्ध 4 आठवडे सुरू राहिल. मात्र, तिथेच त्यांचा अंदाज चुकला.

नुकताच या महत्वाच्या घडामोडीमध्ये मोठी माहिती पुढे येत आहे. Axios ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, इजिप्त, तुर्की, पाकिस्तान यांच्यामार्फत चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात गोपनीय चर्चा झाल्याची माहिती आहे. 48 तासात करार होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

युद्ध रोखण्यासाठी हा शेवटा प्रयत्न म्हणून बघितले जात आहे. पण इराणला 48 तासाचा वेळ कमी असल्याचे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदरच इराणला 24 तासाचा वेळ दिला होता. त्यानंतर त्यांनी 48 तास दिले. इराण आपल्या काही प्रमुख मागण्यांवर ठाम असल्याचे बघायला मिळत आहे. युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई त्यांना हवी आहे. मात्र, गेल्या 28 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच युद्ध थांबवण्याकरिता अशाप्रकारचे मोठे प्रयत्न केले जात असल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....