AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात २० हजारात चहा आणि १ लाखात लंच, तरीही जगातला सर्वात स्वस्त देश, होते पर्यटकांची मोठी गर्दी

जगातल्या या छोट्या देशात अनेक भारतीय फिरायला जातात.येथे चहाचे बिल देखील २० हजार रुपये येते. कोणता आहे हा देश पाहूयात...

या देशात २० हजारात चहा आणि १ लाखात लंच, तरीही जगातला सर्वात स्वस्त देश, होते पर्यटकांची मोठी गर्दी
laos
| Updated on: Apr 07, 2026 | 9:26 PM
Share

जगात एखादा देश असा असेल की जिथे सकाळचा नाश्ता करायला हॉटेलात गेला तर लाखो रुपयांचे बिल येईल. एका चहाची किंमत २० हजार रुपये असेल. आणि फॅमिलीसह हॉटेलात गेला तर लाखो रुपयांचे बिल भरावे लागत असेल. तुम्हाला वाटेल की हा कल्पनेचा खेळ आहे.परंतू हे एकदम सत्य गोष्ट आहे. हा देश भारतापासून हवाई मार्गाने केवल अडीच हजार किमीवर आहे. त्याचे नाव लाओस आहे. लाओस हा असा देश आहे जेथे तुम्हाला अशा कल्पनेतील घटना खऱ्या वाटू लागतील. तर तुम्ही २० हजार रुपये चहासाठी तयार ठेवा.. काय आहे नेमके प्रकरण पाहूयात…

या देशात इतकी महागाई का असे तुम्हाला वाटत असेल. लाओस याच्या चलनाला किप म्हटले जाते. तुम्ही या सुंदर देशात चहा प्यायला जात तर हॉटेलात तुम्हाला २० हजार किप भरावे लागतील. परतू आपल्या भारतीय चलनात याचे केवळ ५० रुपये होतील.त्यामुळे लाओस जगातील सर्वात स्वस्त देश आहे. लाओस त्याच्या वेगळ्या अर्थव्यवस्थेमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. परंतू लाओस जाणारे टुरिस्ट नेहमीच आहात नोटांच्या गड्ड्या घेऊन फिरतात आणि नोटा मोजता.. मोजता..त्यांना घाम फुटतो.

प्रत्येक जण करोडपती

लाओसला जगातला सर्वात महागडा देश मानण्याआधी येथील चलनाचे गणित जाणून घ्यावे लागेल.वास्तविक लाओसची करन्सी किपचे मुल्य भारतीय रुपयाच्या तुलनेत इतके कमी आहे की तेथे जाणारा एखादा सामान्य भारतीय देखील तेथे करोडपती होतो. त्यामुळे या देशात सर्वात परदेशी पर्यटकांची गर्दी असते. कारण लाखो रुपयांचे बिल भरुनही तुमचा खिसा खाली होत नाही. त्यामुळे या छोट्या देशात पर्यटकांची गर्दी असते. येथे सध्या दरवर्षी ५५ लाख परदेशी पर्यटक येतात. आणि तेथील अर्थव्यवस्थेत १ अब्ज डॉलरचे योगदान देतात.

एका रुपयात किती लाओसी कीप ?

मार्च २०२६ च्या विनियम दराच्यानुसार १ भारतीय रुपया सुमारे २३२ लाओशियन किप-LAKच्या बरोबर आहे.लाओस भारतीय पर्यटकांसाठी खूपच स्वस्त आणि सुंदर देश आहे. येथे फिरण्यासाठी आणि शांततेचे क्षण व्यतित करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. चला तर पाहूयात लाओस येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी किती कीप द्यावे लागतील. जर तुम्हाला पाण्याची बाटली विकत घ्यायची आहे तर येथे ८ चे १२ हजार लाओशियन किप द्यावे लागतील. यासाठी तुम्हाला ३५ ते ४० भारतीय रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही तेथे बिस्कीटाचे पाकिट विकत घ्यायला जाल तर १० हजार ते २५ हजार लाओशियन किप खर्च करावे लागतील, मात्र भारतीय रुपयात ते बिस्कीट ४५ ते १०० रुपयांपर्यंत असेल.

लाओस हा सुंदर देश

जर लाओस मध्ये तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर २५ ते ५० हजार रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ भारतीय रुपयात १७० ते ४०० रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला येथील हॉटेलात रहायचे असेल तर एका रात्रीचे रुमचे भाडे म्हणून सव्वा लाख ते साड तीन लाख लाओशियन किप भरावे लागतील. सामान्य हॉटेलचे हे भाडे भारतीय रुपयात केवळ ५०० ते २००० रुपयांच्या दरम्यान असेल. त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाही. लाओस हा सुंदर देश आहे. तेथे कमी खर्चात रहाता येते. त्यामुळे अनेक भारतीय लाओसमध्ये फिरायला जात असतात. भारतीयांसाठी लाओस व्हीसा ऑन अरायवलची सुविधा देते.

Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....