AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत चीन वादावर तोडगा काढण्यासाठी 21 वर्षात 25 बैठका, काय घडले वाचाच..

अरूणाचल प्रदेशात चीनचा प्रभाव वाढताना दिसत आहे. दोन देशातील हा वाद आता पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ITBP चे डीजी शत्रुजीत कपूर यांनी केलेले वक्तव्य. ज्यावरून नवा वाद पेटला आहे.

भारत चीन वादावर तोडगा काढण्यासाठी 21 वर्षात 25 बैठका, काय घडले वाचाच..
India China
| Updated on: Oct 23, 2026 | 6:30 PM
Share

भारत आणि चीन या दोन देशातील असलेला तणाव संपूर्ण जगाला माहिती असला तरी तो वाद निवळण्यासाठी होत असलेले दोन देशातील प्रयत्न अजूनही कधी समोर आलेले दिसले नाहीत. परंतू या वादावर तोडगा काढण्याठी भारत आणि चीन या दोन देशात 21 वर्षात तब्बल 25 बैठका झाल्याचं समोर आले आहे. त्यातील शेवटची बैठक ऑगस्ट 2026 मध्ये बिजिंग शहरात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दोन्ही देशातील सिमावादावर चर्चा होवून 8 मुद्दांवर सहमती झाली आहे.

अरूणाचल प्रदेशात चीनची पुन्हा घुसखोरी मात्र, दोन देशातील हा वाद आता पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ITBP चे डीजी शत्रुजीत कपूर यांनी केलेले वक्तव्य. कपूर यांनी म्हंटले आहे की, मागील काही महिन्यात अरूणाचल प्रदेशात चीनचे आणि भारताचे सैनिक एकमेकांसमोर आल्याची घटना घडलीय. काही ठिकाणी तर वादही झालेत आणि ही संघर्षाची परिस्थिती अजूनही सुरूच आहे. मात्र, ज्या वास्तविक नियंत्रण रेषेवरून (LAC) हा सगळा वाद सुरू आहे तो अनेक दशकांचा असून त्यावर शांतता प्रस्थापित यासाठी दोन्ही देशात 25 बैठका पार पडल्यात.

25 व्या बैठकीत भारत-चीन दोन्ही देशात काय ठरलं? भारत आणि चीन या दोन्ही देशातील वाद सोडविण्यासाठी 2003 मध्ये पहिली बैठक पार पडली आणि त्याच्या 25 फेऱ्या पार पडल्यात. 25 व्या फेरीत या वादावर 8 मुद्द्यांवर सहमती झाली आहे. ते मुद्दे खालीलप्रमाणे – दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखावी यासाठी प्रयत्न केले जावेत – देन्ही देशाची सिमा निश्चित करण्याठी सुरू असलेली चर्चा पुढेही चालू ठेवावी – सिमा निश्चिती दरम्यान सिमेलगतच्या समुदायाला विचारात घेणे – जर अचानक कुठं वाद निर्माण झाला तर चर्चा करणे – पुर्व आणि मध्य क्षेत्रात दोन हॉटलाइन, सैन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी दोन नविन ठिकाण निश्चिती – दोन्ही देशातील व्यापार आणि तीर्थ यात्रेवर चर्चा – पाण्याचे वाद सोडविण्यासाठी चर्चा – 2027 मधील बैठक भारतात आयोजीत करण्यात येणार

बैठकांमधून काय साध्य होणार? भारत आणि चीन या दोन देशातील वादावर सातत्याने सुरू बैठकांमधून संभाषण वाढत आहे. मात्र यावर कुठलाही अंतिम तोडगा निघाला नाही अथवा निघण्याचीही शक्यता नाही. कारण चीनही आपल्या दाव्यावर ठाम आहे आणि भारतही मागे हटायला तयार नाही.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…