AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत, पाकिस्तान की चीन… युद्धाचा सर्वाधिक फटका कोणत्या देशाला? IMF च्या आकड्यांनी जगभरात खळबळ

IMF War impact Report : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अहवाल जारी केला आहे, यात इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे.

भारत, पाकिस्तान की चीन... युद्धाचा सर्वाधिक फटका कोणत्या देशाला? IMF च्या आकड्यांनी जगभरात खळबळ
war impact reportImage Credit source: Google
| Updated on: Apr 17, 2026 | 3:10 PM
Share

इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. अनेक देशांच्या विकास दरावर याचा परिणाम झाला आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अहवाल जारी केला आहे, यात इराण युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचे समोर आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अर्थव्यवस्थेत दिसत असलेली तेजी आता थांबली आहे. IMF ने 2026 साठी जागतिक अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज 3.4% वरून कमी करून 3.1% केला आहे. जर परिस्थिती अधिक बिघडली, तर हा दर 2% पर्यंत घसरू शकतो आणि जगभरात महागाई 6% पर्यंत पोहोचू शकते. हा संपूर्ण जगाला मोठा धक्का.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ पियरे-ओलिव्हिएर गॉरिंचास यांनी सांगितले की, मध्यपूर्वेतील युद्ध हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे. यामुळे तेल आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे महागाई वाढत आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. होर्मूज सामुद्रधुनीतील अडथळे आणि परिसरातील नुकसानामुळे तेल पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर बसला आहे.

अमेरिकेत मंदीचा धोका

या युद्धामुळे अमेरिकेत पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते, यामुळे ट्रम्प यांच्या देशात मंदी येण्याचा धोका वाढला आहे. IMF च्या मते, 2026 मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था 2.3% दराने वाढेल, जो आधीच्या अंदाजापेक्षा 0.1% ने कमी आहे. 2027 साठी 2.1% वाढीचा अंदाज थोडा सुधारित मानला जात आहे.

G7 देशांमध्ये ब्रिटनला सर्वाधिक फटका

G7 देशांमध्ये ब्रिटनला सर्वाधिक नुकसान झाले आहे. 2026 साठी त्याचा वाढ दर 0.5% ने कमी करून 0.8% केला आहे, तर 2027 साठी तो 1.3% राहण्याचा अंदाज आहे. सौदी अरेबियालाही मोठा फटका बसला आहे. 2026 साठी त्याचा वाढ दर 1.4% ने कमी करून 3.1% केला आहे. मात्र, 2027 मध्ये वाढून होऊन तो 4.5% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

चीन आणि कॅनडालाही फटका

चीन आणि कॅनडाच्या अर्थव्यवस्था वाढीच्या दरात 0.1% ने घट झाली आहे. 2026 साठी चीनच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात 0.1% ने घट करण्यात आली आहे, तर 2027 च्या अंदाजात कोणताही बदल नाही. कॅनडासाठीही 2026 चा अंदाज 0.1% ने कमी करण्यात आला आहे, तर 2027 साठी कोणताही बदल नाही.

भारत-पाकिस्तानची स्थिती चांगली

भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेने चांगली आहे. 2026 आणि 2027 साठी भारताच्या अंदाजात 0.1% ने वाढ करण्यात आली आहे. 2025 मध्ये भारताचा वाढ दर 7.6% होता, तर 2026 आणि 2027 मध्ये तो 6.5% राहू शकतो. पाकिस्तानसाठी सर्वाधिक सुधारणा दिसून आली आहे. 2026 साठी अंदाजात 0.4% आणि 2027 साठी 0.6% ने वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर 2025 मध्ये 3.89%, 2026 मध्ये 3.6% आणि 2027 मध्ये 3.5% राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...