अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, भारताचा तब्बल 9000 कोटींचा थेट फायदा, जगात तणाव पण..
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर जगात तणावाची स्थिती बघायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे भारताची चांदी होताना दिसतंय. भारताचा मोठा फायदा होणार असून तब्बल 9000 कोटींचा कर्जाची परफेड होईल.

व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर जगात एकच खळबळ उडाली. अनेकांनी पुढे येत या हल्ल्याचा निषेध केला. व्हेनेझुएलाची सत्ता अमेरिकेच्या हातात आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेने अटक केली असून मादुरो सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत. व्हेनेझुएला तेलावर आता अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून व्हेनेझुएला आणि दक्षिण अमेरिकेतील देश अमेरिकेविरोधात तंबू ठोकून आहेत. पहिल्यांदाच अमेरिकेने मोठे धाडस केले आणि थेट व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये घुसले आणि थेट मादुरो यांना त्यांच्या पत्नीसोबत अटक करून अमेरिकेत नेले. रशियासह चीनही या कारवाई विरोधात मैदानात उतरले.
हे महायुद्ध घडवून आणण्याचे कारण होऊ शकते, असेही अनेक देशांनी म्हटले. व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांनी अजून दोन देशांना धमकी दिली. निकोलस मादुरो यांचा न्यूयॉर्क येथील जेलमधील व्हिडीओ व्हायरल झाला. अमेरिकेने घेतलेल्या अॅक्शनमुळे रशियासह अन्य देशांचे टेन्शन वाढले आहे. मात्र, अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेला हल्ला भारतासाठी फायदेशीर ठरू शकतो.
व्हेनेझुएलाच्या तेलावरील अमेरिकेच्या नियंत्रणामुळे भारताचे 1 अब्ज डॉलर्सचे थकीत कर्ज फिटेल. हेच नाही तर उत्पादनातही मोठी वाढ होऊ शकते. याचा थेट भारताला होणार हे स्पष्टच आहे. व्हेनेझुएलच्या तेल क्षेत्रातील अधिग्रहण सुमारे 9,000 कोटींपेक्षा जास्त दीर्घकालीन कर्जाची परतफेड होऊ शकते. शिवाय भारत लॅटिन अमेरिकन देशात संचालित क्षेत्रात कच्च्या तेलाचे उत्पादनही वाढू शकेल.
दोन्ही बाजुंनी भारताचा फायदा होणार हे जवळपास निश्चित आहे. व्हेनेझुएलच्या तेलाच्या पायाभूत सुविधांसाठी अमेरिका अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करेल. अमेरिकेच्या हातात आता व्हेनेझुएलाचे तेल असणार आहे. मात्र, याचा फटकाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्यासाठी मोठा दबाव भारतासह अन्य देशांवर अमेरिकेचा आहे. हेच नाही तर भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. तेलाचा कब्जा आपल्या हातात ठेवण्यासाठी अमेरिकेने मोठा डाव रचल्याचे सांगितले जाते.
