AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-China : आता बस्स, खूप झालं…! भारत चीनवर भडकला, तडकाफडकी शेवटची वार्निंग, कारण?

भारत पुन्हा चीनवर भडकला आहे. चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केल्याने भारताने चीनला खडसावले आहे.

India-China : आता बस्स, खूप झालं...! भारत चीनवर भडकला, तडकाफडकी शेवटची वार्निंग, कारण?
india and china news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 9:18 AM
Share

अरुणाचल प्रदेशच्या चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून भारत हा चीनवर चांगलाच भडकला आहे. तुमच्या सैन्य दलाची कृत्ये सहन करणार नाही, असा स्पष्ट शब्दात भारताने चीनला खडसावलं आहे. तुमची कृत्ये भविष्यात कदापी सहन करणार नसल्याचे संकेत भारताने चीनला दिले आहेत. दोन्ही देशात काहीशी कटुता निर्माण झाल्याने जागतिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दोन्ही देशाच्या सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक झाली. दोघांमध्ये LAC शी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. ही बैठक रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील टाकसिंगमध्ये चिनी सैनिकांच्या घुसखोरीमुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं. अरुण प्रदेशातील एका भागात भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी गिरीश कालिया यांनी भारताची बाजू चीनसमोर मांडली. त्यांच्या सैन्यातील महत्त्वाचा अधिकारी बैठकीसाठी हजर झाला होता.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे मागील महिन्यात चीन दौऱ्यावर होते. डोभाल यांची चिनी परराष्ट्र मंत्र्‍यांसोबत बैठक झाली. या बैठकीत एलएसीसहीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताने चीनबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे याच आठवड्यात ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. त्याआधी दोन्ही देशाच्या लष्करांच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. माजी संरक्षण दलप्रमुखांनी म्हटलं की,सीमा प्रश्न अद्याप सुटला नाही. एलएसीचा मुद्दा कायम आहे. भारत आणि चीन हे दोन्ही आशियातील मोठ्या शक्ती आहेत. तसेच मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. दोन्ही देशातील संबंध हे सीमा वादापुरते मर्यादित ठेवते येणार नाही’. सेवानिवृत्त चौहान यांनी पुढे म्हटलं की, दोन्ही देश एकमेकांना सहकार्य देखील करतात. एकमेकांचे स्पर्धक देखील आहेत. जागतिक व्यवस्थेविषयी दोघांचे वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे चीनसोबत संवाद आणि संपर्क ठेवणे आवश्यक आहे.

जिनपिंग भारतात येणार

तत्पूर्वी, भारताच्या अध्यक्षेतेखाली 12-13 सप्टेंबर रोजी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे दिल्लीत येण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्या भारत दौऱ्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. जिनपिंग हे जवळपास 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येणार आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली