Video : लिप किस देतेस का…नीच ऑटो चालकाचा कारनामा, परदेशी महिला पर्यटकाला थेट…घटना कॅमेऱ्यात कैद!
परदेशी महिला पर्यटकासोबत घाणेरडा प्रकार घडला. एक ऑटो चालक तिच्याजवळ गेला आणि तिला वारंवार 'लिप किस, लिप किस' अशी विचारणा करू लागला. हा सर्व प्रकार संबंधित परदेशी महिलेच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये कैद झालाय.

Thailand Tourist : भारतीय संस्कृतीत पाहुण्यांना देवाच्या समान मानलं जातं. पाहुण्याला कोणतीही अडचण येऊ नये, त्याला सर्वतोपरी मदत करावी, असं सांगितलं जातं. एखादा पाहुणा परदेशातून आल्यावर त्याला भारतीय भाषा समजत नाही. त्यामुळे अशा पाहुण्यांची, पर्यटकांची तर आपण विशेष रुपाने काळजी घेतो. दरम्यान भारताच्या याच संस्कृतीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला परदेशी पर्यकाला एका तरुणाने चक्क किस देण्याबाबत विचारणा केलीय. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
विचारलं लिप किस देतेस का?
समोर आलेली ही घटना राजस्थानमधील उदयपूर येथील आहे. थायलंडची एक महिला उदयपूरमधील पर्यटनस्थळं पाहायला आली होती. विशेष म्हणजे ती एक यूट्यूबर आहे. ती तिच्या मोबाईलमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग करत होती. याच वेळी तिच्यासोबत हा घाणेरडा प्रकार घडला. एक ऑटो चालक तिच्याजवळ गेला आणि तिला वारंवार ‘लिप किस, लिप किस’ अशी विचारणा करू लागला. हा सर्व प्रकार संबंधित परदेशी महिलेच्या लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये कैद झालाय.
तरुणीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला व्हिडीओ
संबंधित तरुणीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या परदेशी महिलेने पर्यटनस्थळं पाहण्यासाठी एक ऑटोरिक्षा भाड्याने घेतला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ती आरोपी रिक्षाचालकाच्या रिक्षामधून फिरत होती. 13 नोव्हेंबर रोजी संबंधित तरुणी टाऊनहॉल येथील एका यात्रेत गेली होती. तिथे सुरू असलेल्या कार्यक्रमांचे ती लाईव्ह स्ट्रिमिंग करत होती. याच वेळी ऑटो चालकाने तिला लिपक किस देतेस का? अशी विचारणा करून तिचा विनयभंग केला.
दरम्यान, संंबंधित महिलेने हा व्हिडीओ 14 नोव्हेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड केला. आरोपी उदयपूर येधील सेक्टर 11 येथील रहिवासी आहे. अबरार खान असे आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणी कारवाई करत आहेत.