AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय आणि शेअर बाजारात मोठा त्सुनामी, फार्मा कंपनीचे तब्बल 5 टक्क्यांनी…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय फार्मा कंपन्यांना धक्का देणारा एक निर्णय घेतला आणि खळबळ उडाली. भारतीय कंपन्या या अमेरिकन बाजारपेठेत मोठी उलाढाल करतात. मात्र, आता त्यावर 100 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय आणि शेअर बाजारात मोठा त्सुनामी, फार्मा कंपनीचे तब्बल 5 टक्क्यांनी...
Stock Market
| Updated on: Sep 26, 2025 | 11:05 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफनंतर अजून एक धक्कादायक असा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री उशिरा फार्मासह अनेक क्षेत्रांवरील उत्पादनावर त्यांनी मोठा टॅरिफ लावला. भारतीय औषध उत्पादन कंपन्यांसाठी अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ राहिलेली आहे. मात्र, आता अमेरिकेने तब्बल 100 टक्के टॅरिफ लावल्याने थेट धक्का बसला. भारतीय शेअर बाजारावर याचा थेट परिणाम पडल्याचे बघायला मिळतंय. सेन्सेक्स 412.67 अंकांनी घसरून 80, 747.01 वर पोहोचला. निफ्टी 115 अंकांनी घसरून 24,776 वर व्यवहार करत आहे. अमेरिकेतील बाजारपेठेत मोठी गुंतवणूक असलेला फार्मा स्टॉक्स आज कोसळला आहे. हा मोठा पहिला झटका डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर म्हणावा लागेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला. त्याचा परिणाम शेअर बाजारात ऑरोबिंदो, लुपिन, डीआरएल, सन आणि बायोकॉन या कंपन्यांवर बघायला मिळाला. आज अरविंदो फार्माचा शेअर 1.92 टक्क्यांनी घसरून 1,076 रुपयांवर व्यवहार करत आहे. हा मोठा धक्का कंपनीला बसला आहे. अरविंदो फार्माचा मोठा बाजार अमेरिकेत बघायला मिळतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयानंतर कंपनीचा शेअर पडला.

ल्युपिनचे शेअर्स जवळपास ३ टक्क्यांनी घसरले. सन फार्माचे शेअर्स 1580 वर व्यवहार करत आहेत, 3.8 टक्क्यांनी घसरले आहेत. सिप्लाचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले आहेत. अमेरिकेने घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयानंतर फार्मा कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण अनेक भारतीय कंपन्या या अमेरिकेत मोठी उलाढाल करतात. त्यामध्येच आता तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्यात आल्याने संकट उभे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूवातीला भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या सर्व वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आयटी कंपन्यांना धक्का देत H-1B व्हिसावर 88 लाख रूपये शुल्क आकारले. भारताच्या नियंत्रणात असणारे मोठे बंदरही काढून घेतले आणि आता थेट औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर भारतीय कंपन्यांना मोठे नुकसान होणार हे सध्यातरी दिसत आहे. त्याचा परिणाम आजच शेअर बाजारात बघायला मिळाला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?