AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या महिला खेळाडूला दुबई विमानतळावर मोठा धक्का, थेट स्फोट झाला, तिथेच…

इराणने अनेक मोठी हल्ले दुबईमध्ये केली आहेत. इराणच्या मिसाईलच्य टार्गेटवर दुबई विमानतळाचा परिसर होता. फक्त परिसरच नाही तर थेट दुबई विमानतळावरही हल्ला करण्यात आला. यावेळी अनेक भारतीय लोक तिथे अडकले होते.

भारताच्या महिला खेळाडूला दुबई विमानतळावर मोठा धक्का, थेट स्फोट झाला, तिथेच...
Dubai Airport major attack
| Updated on: Mar 01, 2026 | 10:26 AM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर अत्यंत मोठा हल्ला केला. या हल्ल्याने खळबळ उडाली. इराणनेही जोरदार प्रतिउत्तर दिले. साैदी अरेबिया आणि कतारसारख्या 8 देशांमध्ये मिसाईल हल्ला करत अमेरिकेच्या लष्कर बेसवर हल्ला केला. युद्ध पेटलेले असतानाच इस्त्रायल आणि अमेरिकेने थेट इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना टार्गेट केले. फक्त आयातुल्ला अली खामेनेई यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला हल्ल्यात ठार केले. आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगाही या हल्ल्यात ठार झाला. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या घरातील लहान मुलांचाही या हल्ल्याच जीव गेला. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध टोकाला पोहोचले असून मोठ्या युद्धाकडे पाऊस टाकल्याचे बघायला मिळतंय. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराण अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. लोक थेट रस्त्यावर उतरले असून जोरदार निर्देशने केली जात आहेत.

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाच्या स्थितीमध्ये अनेक विमाने रद्द करण्यात आली असून लोक मोठ्या संख्येने विमानतळावर अडकून बसली आहेत. बहरीन ते दुबईपर्यंत इराणने हल्ले केली. इराणी हल्ल्यादरम्यान दुबई विमानतळावर रात्री उशिरापर्यंत भीतीचे वातावरण होते. हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडली होती. भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू देखील क्षेपणास्त्र हल्ले आणि हवाई हल्ल्यावेळी तिथे होती.

स्फोटाची मोठी आवाज, आकाशातून जाणारे मिसाईल आणि सतत क्षेपणास्त्राचे मोठे आवाज हे सर्वकाही पीव्ही सिंधूने अनुभव. उड्डाणे सतत रद्द केली जात होती, युद्धाच्या भीतीत पूर्ण प्रवासी होते. पीव्ही सिंधूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनुभव शेअर केला. परिस्थिती किती जास्त वाईट आहे हे आपल्या पोस्टच्या माध्यमातून पीव्ही सिंधू हिने दाखवले.

तिने मिसाईल जातानाचा फोटोही शेअर केला. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या अत्यंत जवळ पीव्ही सिंधूचे प्रशिक्षक बसले होते. फक्त पीव्ही सिंधू हीच नाही तर अनेक भारतीय लोक दुबईच्या विमानतळावर अडकले होते. दुबई विमानतळावरही मोठा हल्ला करण्यात आला. 4 जण त्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. इराणकडून अनेक ठिकाणी दुबईत मिसाईल हल्ला करण्यात आला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...