AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती, तेच घडलं; भारताच्या मालवाहू जहाजावर भीषण हल्ला

भारताच्या मालवाहू जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याने भारतीय खलाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

ज्याची भीती, तेच घडलं; भारताच्या मालवाहू जहाजावर भीषण हल्ला
boat attack Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 10:32 AM
Share

पश्चिम आशियात इराण आणि अमेरिकेत पुन्हा वाद पेटला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले आहेत. एकीकडे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले देखील करत आहेत. परंतु दोन्ही देशाच्या वादात इतर देशांचं देखील नुकसान होत आहे. याचदरम्यान भारताच्या मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला. ओमानमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्याविषयी माहिती दिली. ‘एमव्ही केप दाओ’ असे मालवाहू जहाजाचे नाव आहे.

मस्कतमधील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाने मृतांच्या कृटुंबाप्रती शोक व्यक्त केलाय. या घटनेनंतर भारतीय प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. या मालवाहू जहाजावर 19 भारतीय नागरिक होते. सरकारकडून मृत खुलाशाच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भीषण घटनेनंतर दुतावासाने निवेदन देखील प्रसिद्ध केलं. निवेदनात म्हटलं की, ‘जहाजावरील एका भारतीय नागरिकाच्या मृत्यूने दु:ख झालं आहे’. फॉरवर्ड सीमेन्स यूनियन ऑफ इंडियाने सांगितलं की, मृत खलाशाची ओळख पटली आहे. सूरज यादव असे मृत खलाशाचे नाव आहे. तो वायपर पदावर कार्यरत होता.  तो उत्तर प्रदेशातील देवरिया भागातला रहिवासी होता. भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला झाला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जहाजावर एकूण 28 कर्मचारी होते. त्यापैकी 20 जण भारतीय होते.

एफएसयूआयच्या दाव्यानुसार, एमव्ही केप दाओ या जहाजावर दोन टॉर्पेडो यांनी हल्ला केला. पहिला हल्ला टॉर्पेडोने सी-डेकवरील राहण्याच्या जागेच्या डाव्या बाजूला केला. तर दुसरा इंजिन रुमजवळ जहाजाच्या डाव्या बाजूला झाला. या घटनेनंतर संघटनेने होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपास काम करणाऱ्या सामान्य खलाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रदेशातून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अधिक सुरक्षा उपाय योजनांची मागणी केली आहे. त्याचबरोबर हल्ल्यांसाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागातील इतर भारतीय खुलाशांना देखील सुरक्षित मार्ग मिळावा, यासाठी आता अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, असं आवाहन केलं.

Follow Us
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?