AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सच्या फाशीला उरले फक्त दोन दिवस, भारताच्या सुप्रीम कोर्टामुळे फाशी टळेल का?

Nimisha Priya : निमिषा प्रिया 2011 साली कुटुंबासोबत येमेनमध्ये गेली होती. या दरम्यान येमेनमध्ये अशांतता निर्माण झाली. त्यामुळे तिचा पती आणि मुलगी दोघे भारतात परतले. ते तीन वर्ष येमेनमध्ये राहून 2014 साली भारतात परतले. पण निमिषा प्रिया तिथेच का थांबली?

Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सच्या फाशीला उरले फक्त दोन दिवस, भारताच्या सुप्रीम कोर्टामुळे फाशी टळेल का?
Nimisha Priya
| Updated on: Jul 14, 2025 | 12:05 PM
Share

केरळमधील नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये फाशीची शिक्षा झाली आहे. तिला वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. आज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिकेद्वारे निमिषाच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने कूटनितीक माध्यमांचा वापर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निमिषाला अजून दोन दिवसांनी 16 जुलैला फाशी होणार आहे, त्याआधी आज याचिकेवर सुनावणी होत आहे. 2017 साली येमेनी बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीच्या कथित हत्या प्रकरणात निमिषा प्रियाला ही फाशीची शिक्षा झाली आहे.

निमिषा प्रियाला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी पीडित म्हणजे मृतकाच्या कुटुंबाला ‘ब्लड मनी’ देण्याच्या पर्यायावर विचार व्हावा, अशी मागणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत करण्यात आली आहे. येमेनमध्ये शरिया कायद्यातंर्गत ही तरतूद योग्य आहे असा याचिकेत तर्क देण्यात आलाय. जस्टिस विक्रम नाथ आणि जस्टिस संदीप मेहता यांचं पीठ या प्रकरणाची सुनावणी करु शकतं.

येमेनच्या कायद्यात ब्लड मनीची तरतूद

सुप्रीम कोर्टात एडवोकेट सुभाष चंद्रन केआर यांनी याचिका दाखल केली आहे. येमेनच्या कायद्यात ब्लड मनीची तरतूद आहे. म्हणजे आरोपी मृतकाच्या कुटुंबाला पैसा देऊन स्वत:ला वाचवू शकतो. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने तिला वाचवण्यासाठी तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाला 10 लाख डॉलर ब्लड मनी म्हणून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

पती, मुलगी परतली पण निमिषा तिथे का थांबली?

निमिषा प्रिया केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी आहे. तिचं वय 38 वर्ष असून ती पेशाने नर्स आहे. निमिषा 2011 साली येमेनमध्ये गेली होती. ती कामासाठी आपल्या कुटुंबासोबत गेली होती. या दरम्यान येमेनमध्ये अशांतता निर्माण झाली. त्यामुळे तिचा पती आणि मुलगी दोघे भारतात परतले. ते तीन वर्ष येमेनमध्ये राहिले. 2014 साली ते भारतात निघून आले. निमिषाने कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.

निमिषाच शारीरिक शोषण

यमेनमध्ये एक नियम आहे. जर परदेशी मेडिकल प्रॅक्टिशनरला क्लीनिक ओपन करायचं असेल, तर त्याला येमेनी नागरिकाला पार्टनर बनवावं लागतं. त्यामुळेच तिने तलाल अब्दो महदीला आपलं पार्टनर बनवलं. पण त्याने कागदपत्रात हेराफेरी करुन निमिषासोबत लग्न केल्याचा खोटा दावा केला. तिचा पासपोर्ट महदीच्या ताब्यात होता. अनेक वर्ष त्याने निमिषाच शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. वारंवार धमक्या दिल्या. 2017 साली निमिषाने महदीच्या तावडीतून निसटण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पासपोर्ट तिला परत मिळवायचा होता. पण त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला. त्यात महदीचा मृत्यू झाला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?