AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत पुन्हा एका भारतीय तरुणाची हत्या, पिझ्झा डिलिव्हरी करण्यास गेला तेव्हा गोळ्या घातल्या

अमेरिकेत भारतीयांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. आता पेन्सिल्वेनिया राज्यातील फिलाडेल्फियात पिझ्झा डिलिव्हरी करण्यास गेलेल्या अंशुल कुंचा याची हत्या करण्यात आली आहे.

अमेरिकेत पुन्हा एका भारतीय तरुणाची हत्या, पिझ्झा डिलिव्हरी करण्यास गेला तेव्हा गोळ्या घातल्या
Indian youth Anshul Kuncha shot dead
| Updated on: Jun 07, 2026 | 3:58 PM
Share

अमेरिकेत भारतीय व्यक्तींवर हल्ले होण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीएत. ताजी घटना अमेरिकेच्या पेन्सिल्वेनिया राज्यातील फिलाडेल्फियात घडली आहे. जेथे एका पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी गेलेल्या एका भारतीयाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. स्थानिक बातम्यानुसार ही शुक्रवारी रात्री उत्तर फिलाडेल्फियात घडली आहे.

सीबीएस न्यूजच्या बातमीनुसार काही लोकांनी पिझ्झा ऑर्डर केला आणि डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या घातल्या. ज्यात त्याचा मृत्यू झाला, बातमीनुसार पीडित तरुण २८ वर्षांचा होता.ज्याला जखमी अवस्थेत पोलिसांनी टेम्पल युनिव्हर्सिटी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यास शनिवारी रात्री सुमारे १ वाजता मृत घोषीत करण्यात आले आहे.

भारतीय दूतावासाने दु:ख व्यक्त केले

सीबीएस न्यूजने मृताचे नाव जाहीर केले नव्हते मात्र, अनेक भारतीय प्रसारमाध्यमांच्या बातमीनुसार मृताचे ओळख पटली असून त्याचे नाव अंशुल कुंचा असे आहे. कुंचा यांच्या मृत्यूबद्दल न्यूयॉर्कच्या भारतीय वाणिज्य दूतावासाने दु:ख व्यक्त केले आहे. दुतावासाने एक्सवर पोस्ट करीत म्हटले आहे की फिलाडेल्फियात भारतीय नागरिक अंशुल कुंचा यांच्या आकस्मिक निधनाने आम्ही दु:खी आहोत. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांबद्दल आमची सहवेदना आहेत. दूतावास अंशुलच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून सर्व शक्य ती मदत केली जात आहे.

कुठे झाली घटना ?

सीबीएस न्यूजच्या बातमीनुसार फिलाडेल्फियात रेमंड रोसेन होम्स नावाच्या सोसायटीत एक रिकाम्या घरात कोणीतरी पिझ्झा ऑर्डर केला होता. पीडिताने ऑर्डर डिलिव्हर केली आणि परिसरातून तो निघत असताना त्याच्यावर गोळ्या छाडण्यात आल्या. फिलाडेल्फिया हाऊसिंग अथॉरिटीच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. यात अंशुल पिझ्झा घेऊन जाताना दिसत आहे. आणि त्याच्या मागे दोन लोक चालताना दिसत आहेत.ज्यांनी डार्क रंगाचे कपडे परिधान केले होते आणि त्यांच्याकडे एक बॅग होती.

अंशुल कुंचा कोण ?

अंशुल कुंचा यांनी अमेरिकेत बिझनस एनालिटिक्समध्ये डिग्री मिळविली होती. आणि त्यांनी २०२४ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. त्यांच्या लिंक्डईन प्रोफाईल नुसार ते पेन्सिल्वेनियातील डेटा बँक आयएमएक्समध्ये डेटा व्हॅलिडेशन एनालिस्ट रुपात काम करत होते.

येथे पोस्ट पाहा –

त्याच्या आधी अंशुल यांनी तेलंगानाच्या हैदराबाद येथील चैतन्य भारती इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची डिग्री मिळविली होती. अमेरिकेतील कुंचा अतिरिक्त उत्पन्नासाठी विकेंडला पार्ट-टाईम पिझ्झा डिलिव्हरी एक्झीक्युटिव्हच्या रुपात काम करत होते.

कुंचा यांची बहिन तन्वी हीने आरोप केला आहे की तिच्या भावाच्या हत्येसाठी कट रचण्यात आला होता असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. तिने पुढे सांगितले की अंशुल यांच्या डोक्यात तीन गोळ्या घालण्यात आल्या आणि मृतदेह रस्त्यावर टाकून दिला होता.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात