जगातल्या सर्वात मोठ्या युद्धाचा भडका, शेवटच्या आदेशाने…डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात काय?

सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे. कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता अमेरिकेतून मोठी बातमी समोर येत आहे.

जगातल्या सर्वात मोठ्या युद्धाचा भडका, शेवटच्या आदेशाने...डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात काय?
donald trump and ayatollah ali khamenei
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 5:43 PM
America And Iran War : गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात उघड-उघड संघर्ष चालू आहे. इराणमधील सत्ता उलथवून लावण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिके इराणवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या या दबावापुढे मात्र इराण अजूनही झुकण्यास तयार नाही. असे असतानाच आता अमेरिका सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. कोणत्याही क्षणी अमेरिकन सैन्य इराणवर थेट हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठीची पूर्ण तयारीही झालेली असल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात अमेरिका इराणवर मोठा हल्ला करू शकते. त्याआधी छोटे-छोटे हल्ले करून इराणवर दबाव टाकण्याची रणनीती अमेरिकेकडून अवलंबीली जाऊ शकते. या छोट्या हल्ल्यांमुळेही इराण अण्वस्त्रनिर्मितीची मोहीम सोडून देण्यास तयार नसेल तर मग मात्र अमेरिका इराणवर मोठे हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे. येत्या गुरुवारी अमेरिका आणि इराण यांच्यात जिनेव्हा येथे एक बैठक होत आहे. या बैठकीत दोन्ही देश वाद मिटवण्याचा प्रयत्न करतील. या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यास मात्र अमेरिकेकडून युद्धाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.

अमेरिका नेमका कशावर हल्ला करणार?

 
अमेरिकेचा मुख्य हेतू हा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामैनी यांची सत्ता उलथवून लावणे हा आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिका आपल्या हल्ल्यांत इराणचे आण्विक तळ, बॅलेस्टिक प्रोग्रॅमशी संबंधित ठिकाणं, इस्लामिक गार्डशी संबंधित इमारती यांना सर्वात अगोदर लक्ष्य करण्याची शक्यता आहे. अमेरिकेने या हल्ल्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. परंतु दोन्ही देशांमध्ये एकमत न झाल्यास अमेरिकेकडून हा हल्ला केला जाऊ शकतो.

कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता

अतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार इराणवर हल्ला करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. हवाई हल्ल्यासह इतरही काही मार्गाने इराणला नामोहरम करता येऊ शकते का, याविषयी अभ्यास केला जातोय. परंतु अमेरिकेने आपले सैन्य तयार ठेवले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.