AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : इराणची जबरदस्त वॉर स्ट्रॅटजी, एकाचवेळी इस्रायलवर तीन देशांमधून भयंकर हल्ला

Iran-Israel War : इस्रायलने इराणवर आज सकाळी हल्ला केला. त्यानंतर इराणने सुद्धा जबरदस्त प्रत्युत्तर दिलय. इराणने इस्रायलवर एकाचवेळी तीन बाजूंनी हल्ला केलाय. इस्रायलची आता खरी कसोटी लागणार आहे. इस्रायलला तीन देशांमधून होणारे हल्ले संभाळायचे आहेत.

Iran-Israel War : इराणची जबरदस्त वॉर स्ट्रॅटजी, एकाचवेळी इस्रायलवर तीन देशांमधून भयंकर हल्ला
Iran-Israle War
| Updated on: Feb 28, 2026 | 3:13 PM
Share

इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरु झालय. दोन्ही देशांकडून परस्परांवर हल्ले सुरु आहेत. इराणने इस्रायलला प्रत्युत्तर देताना भयंकर हल्ला केला आहे. इराणने इस्रायलवर 70 बॅलेस्टिक्स मिसाइल्स डागली आहेत. इराणने इस्रायलने दिशेने डागलेल्या बॅलेस्टिक मिसाइल्सची ओळख पटली आहे असं इस्रायली आर्मी IDF कडून सांगण्यात आलं आहे. संपूर्ण देशात अलर्ट जारी झाला आहे. जेरुसलेम, हायफा आणि शेफेल्लाह या इस्रायली शहरांवर इराणने मिसाइल हल्ला केला आहे. जेरुसलेममध्ये सायरन वाजत आहेत. लोकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्यास सांगितलं आहे.

ताज्या बातमीनुसार इराणने दुसऱ्यांदा इस्रायलवर मिसाईल्स लॉन्च केली आहेत. इस्रायल आपल्या पूर्ण क्षमतेसह इराणी मिसाइल्स नष्ट करत आहे. इस्रायलवरील ड्रोन, मिसाइल हल्ल्याची पहिली लाट अजून पूर्ण झालेली नाही असं इराणी आर्मी IRGC कडून सांगण्यात आलं आहे. IRGC कडून अजूनपर्यंत नुकसानीचा कोणताही दावा करण्यात आलेला नाही.

लोकांना सुरक्षित स्थळी बॉम्ब शेल्टर जवळ जाण्यास सांगितलं

रिपोर्टनुसार उत्तर इस्रायलमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू आले आहेत. इस्रायलने आपली एअर डिफेन्स सिस्टिम Active केली आहे. इस्रायलने संपूर्ण देशात इमर्जन्सी आणि स्पेशल स्टेट ऑफ इमर्जन्सी घोषित केली आहे. संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजत आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी बॉम्ब शेल्टर जवळ जाण्यास सांगितलं आहे.

IDF ने काय म्हटलय?

उत्तर इस्रायलमध्ये इराणच्या बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्यानंतर कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाहीय. कमीत कमी दोन मिसाइल्स डागण्यात आली. यात एक मिसाइल मोकळ्या जागेत जाऊन पडली. इराणकडून अजून एका बॅलेस्टिक मिसाइल्सचा येणारा ताफा डिटेक्ट केलाय असं IDF कडून सांगण्यात आलं.

एकाचवेळी तीन देशांमधून इस्रायलवर हल्ला

इस्रायलवर इराणमधून हल्ला होईल हे तर स्पष्ट होतच. पण इराणने लेबनॉन, येमेनमध्ये जे प्रॉक्सी उभे केलेत, म्हणजे दहशतवादी गट उभे केलेत. त्यांनी सुद्धा इस्रायलवर हल्ला केलाय. लेबनॉनमधून हिजबोल्ला, येमेनमधून हुतींनी हल्ला केलाय. म्हणजे एकाचवेळी इस्रायल तीन बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना संभाळायचं आहे. याआधीच्या अनेक युद्धात इस्रायलला एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढण्याचा अनुभव आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...