AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय, इराणची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली; आता पर्याय काय उरला?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने इराण बेहाल झाला आहे. त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे इराणवर होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अमेरिकेचे म्हणणं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय, इराणची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली; आता पर्याय काय उरला?
america
| Updated on: Sep 27, 2026 | 9:56 AM
Share

इराणने सात दिवसांत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेसमोर अटी ठेवल्या आहेत. इराणच्या अटी डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, खंरतर होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्याने इराणची कमाई बंद झाली आहे. इराणच्या लोकांचे खाण्याचेही हाल होऊ लागले आहेत. तेथील नागरिक भुकेने व्याकुळ झाले आहेत. त्यामुळे इराणला होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु आम्ही त्यांना सहजासहजी माफ करणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

इराणने काय म्हटलं होतं?

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी म्हटलं की, अमेरिकेच्या अणुकार्यक्रमावर चर्चा पुन्हा सुरू करणे हा प्रस्तावाचा एक भाग आहे. आम्ही होर्मजची सामुद्रधुनी खुली करण्यास आणि संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांना इराणमध्ये प्रवेश देण्यासही तयार आहे’. पुढे त्यांनी दावा केला आहे की, ‘अमेरिकेने होर्मुजची सामुद्रधुनी आणि अणु चर्चा पुन्हा करण्याच्या नवीन प्रस्तवाला सहमती दर्शवली आहे. इराण दिलेले वचनाचं पालन करेल’. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास यांनी अमेरिकेसमोर प्रस्ताव मांडला. सर्वसमावेशक अणु करारावर अमेरिकेसोबत चर्चा सुरू होईल. दोन्ही देशात चर्चा झाल्यानंतर सात दिवसांच्या आत होर्मजची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाऊ शकते’.

इराणचा प्रस्ताव अमेरिकेला अमान्य

इराण आणि अमेरिका यांच्यातीव तणाव पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. इराणने अमेरिकेला युद्धविरामासाठी तीन अटी दिल्या आहेत. तुर्कीमार्फत हा प्रस्ताव अमेरिकेला पाठवला. प्रस्ताव अमेरिकेने मान्य केल्यानंतर सात दिवसांत होर्मुज खाडी पूर्णपणे सुरक्षित होईल, असे इराणने स्पष्ट केलंय. अमेरिकेने या इराणचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती मिळत आहे. इराणचा प्रस्ताव मान्य नसल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्याचसोबत मोठी धमकी दिली आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावलाय. त्यानंतर याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेच्या निर्णयानंतर इराणने तात्काळ स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये लष्करी ताकद प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?