AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणला मोठा धक्का! खामेनेई यांच्यानंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा मृत्यू; इस्रायलने हल्ला करून थेट…

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू झालेले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आता इराणच्या आणखी एक मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना समोर येताच आता खळबळ उडाली आहे.

इराणला मोठा धक्का! खामेनेई यांच्यानंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा मृत्यू; इस्रायलने हल्ला करून थेट...
mahmoud ahmadinejad Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 01, 2026 | 8:43 PM
Share

Iran Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा चांगलाच भडका उडाला आहे. हे दोन्हीही देश युद्धात माघार घेण्यास तयार नाहीत. या युद्धात इस्रायलच्या सोबतीने अमेरिकादेखील इराणवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगभरातून संताप व्यक्त केला जातोय. इराणनेही आता जास्तच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. असे असतानाच आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच आता इराणच्या आणखी एका बड्या नेत्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

इराणच्या माजी राष्ट्रपतींचा हल्ल्यात मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अहमदीनेजाद यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक तसेच अन्य जवळच्या काही व्यक्तींचाही मृत्यू झाला आहे. अहमदीनेजाद यांच्या सुरक्षेसाठी इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) जवान तैनात होते. प्राप्त माहितीनुसार अहमदीनेजाद हे एका इमारतीत आपल्या टीमसह आश्रयाला होते. याच इमारतीवर शनिवारी हल्ला करण्यात आला. इराणची राजधानी तेहरानाच्या उत्तर-पूर्व भागात ही इमारत होती. याच भागात माजी राष्ट्रपती अहमदीनेजाद यांचे निवासस्थानही आहे.

आम्ही हल्ले करत राहू

इस्रायलने केलेल्या या हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये हल्ल्यानंतर अहमदीनेजाद यांच्या निवासस्थान परिसरात कसा विध्वंस झाला हे दाखवण्यात आले आहे. या हल्ल्यात दोन शाळकरी मुलांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या या हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी आम्ही जशास तसे उत्तर देत राहू. आम्ही अमेरिकेच्या तसेच इस्रायलच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त करत राहू, असा इशारा दिलेला आहे.

इराणने आतापर्यंत कोणत्या देशांवर हल्ले केले

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने आतापर्यंत कुवैत, कतार, इराक, सैदी अरेबिया या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. याशिवाय इराणने संयुक्त अरब अमिरातीवरही हल्ला केला आहे. असे असताना आता इराणच्या माजी राष्ट्रपतींचाही मृत्यू झाल्यामुळे इराण भविष्यात काय करणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?