AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा मोठा हल्ला, पूर्ण देश भीतीत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मोठे हल्ले सुरू झाली आहेत. कोणत्याही देशाच्या मध्यस्थीला यश मिळत नाहीये. आखाती देशांपुढे मोठे संकट आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा हल्ला झालाय.

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा मोठा हल्ला, पूर्ण देश भीतीत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी थेट..
Attack drones and missiles
| Updated on: Jun 03, 2026 | 6:52 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध एकदाचे थांबावे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, युद्ध थांबणे दूरच पण परिस्थिती अधिक चिघळत आहे. अमेरिकेकडून सातत्याने सांगितले जात आहे की, इराण आणि अमेरिका युद्धविरामाच्या अत्यंत जवळ आहे. मात्र, घोषणा काही होत नाही. युद्धविरामाच्या घोषणेची प्रतिक्षा जग करत आहे. यादरम्यानच आता खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. सोमवारी सकाळी सकाळी कुवेतवर मोठा हल्ला करण्यात आला. मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर पूर्ण कुवेतमध्ये सायरन वाजले. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा हल्ला इराणकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सायरन वाजल्यानंतर लोक सुरक्षित स्थळी गेले. कुवेतच्या न्यूज एजन्सीच्या म्हणण्यांनुसार, त्यांच्या पूर्ण देशात सायरन वाजले. त्यानंतर लष्कराकडून तात्काळ डिफेंस सिस्टम अॅक्टिव करण्यात आली.

ज्यामुळे मिसाईल आणि ड्रोन हल्ले हवेतच रोखण्यात आली. दुसरीकडे इराणकडून जागतिक जलक्षेत्रात अमेरिकेचे ड्रोन MQ-1ला मारून पाडले आहे. इस्त्रायलने लेबनानमध्ये मोठी कारवाई सुरू केलीये. मोठे हल्ले केले जात आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो यांनी इस्त्रायल आणि लेबनानच्या नेत्यांसोबत चर्चा केली. अमेरिकेने प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर इस्त्रायलकडून मोठे हल्ले केले जात आहेत.

मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. कुवेतमध्ये इराणकडून हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर अजून इराणकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. पुन्हा एकदा परिस्थिती तणावात आहेत. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या युद्धात आखाती देशांमध्ये हल्ले होत आहेत. होर्मुज खाडीतही मोठ तणाव आहे.

कुवेतवर हल्ल्याला सुरूवात झाल्यानंतर सायरन वाजण्यास सुरूवात झाली. लोक घर सोडून सुरक्षितस्थळी गेले. पुन्हा एकदा इराण आक्रमक भूमिकेत बघायला मिळत आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणने जगाला पळो की सळो करून सोडले. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली. तेलाच्या भाव प्रचंड वाढत आहे. जर हे युद्ध पुढील काही दिवस असेच चालत राहिले तर त्याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागू शकतात. परिस्थिती अधिक बिकड होऊ शकते.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!