अखेर सर्वात मोठ्या युद्धाचा क्षण आला, अमेरिकेला जबर धक्का; इराणने तो प्रस्ताव… एका निर्णयाने जगात खळबळ!

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानत यात सर्वात पुढे आहे. दरम्यान आता पाकिस्तान आणि अमेरिकेला धक्काद देणारा निर्णय इराणने घेतला आहे. त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.

अखेर सर्वात मोठ्या युद्धाचा क्षण आला, अमेरिकेला जबर धक्का; इराणने तो प्रस्ताव... एका निर्णयाने जगात खळबळ!
donald trump and iran war
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2026 | 4:36 PM

America And Iran War : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा संपूर्ण जगाला फटका बसत आहे. भारत, पाकिस्तान, चीन यासह इतरही अनेक देशांपुढे मोठं उर्जासंकट उभं राहिले आहे. हे संकट टळावे आणि जागतिक व्यापारसाखळी पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मोहिमेत पाकिस्तानने पुढाकार घेतलेला आहे. पाकिस्तानने इराणला 15 कलमी शांतता प्रस्ताव पाठवला होता. परंतु आता इराणमधून मोठी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानने पाठवलेला प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं आहे?

मिळलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने इराणला 15 कलमी शांतता प्रस्ताव पाठवला होता. परंतु आता हा प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. इराणने या प्रस्तावातील अटी मान्य नसल्याचे सांगितले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेच ही माहिती दिली आहे. आमच्या देशाचे राष्ट्रीय हीत लक्षात घेऊनच आम्ही युद्धविरामावर चर्चा करू, असे इराणने स्पष्ट केले आहे. याबाबत असोशिएटेड प्रेस या न्यूज एजन्सीने एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यासाठी एक मसुदा पाठवण्यात आला होता. हा मसुदा पाकिस्तानने तयार केला होता. युद्ध संपवण्यासाठी योग्य मार्गाचा शोध घेण्यासाठी सध्या शस्त्रसंधी होणे आवश्यक आहे. त्यामुळे 45 दिवसांसाठी तात्पुरती शस्त्रसंधी आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात तरतुदी या मसुद्यात होत्या. परंतु इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी आम्ही आमच्या अटी अमेरिकेला अगोदरच सांगितलेल्या आहेत, असे स्पष्ट कले आहे.

अमेरिका नेमकं काय करणार?

आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडून तसेच घाबरून कोणाशीही चर्चा करणार नाही. आमच्या काही अटी या आमच्या राष्ट्रीय हितासाठी आहेत, असेही बगाई म्हणाले आहेत. दरम्यान, आता इराणने पाकिस्तानचा हा प्रस्ताव धुडकावलेला आहे. त्यामुळे अमेरिका नेमकं काय करणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येणाऱ्या 7 एप्रिल रोजी इराणचे उर्जा केंद्र तसेच पुल उडवून देण्याची धमकी दिली आहे.

Follow Us