AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : जग हादरलं! इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला, 105 क्षेपणास्त्र डागले; आता युद्ध आणखी भडकणार

जगात नव्या युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ले केल आहेत. आता इराणनेही इस्रायलवर मोठे हल्ले केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे.

Iran Israel War : जग हादरलं! इराणचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला, 105 क्षेपणास्त्र डागले; आता युद्ध आणखी भडकणार
iran attack on israelImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 28, 2026 | 2:50 PM
Share

Iran Attack On Israel : गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. आम्ही कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू, असे अमेरिकेकडून सातत्याने सांगितले जात होते. विशेष म्हणजे अमेरिकन सैन्याने त्यासाठी तयारीही केली होती. असे असतानाच आता मोठं युद्ध पेटलं आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर मोठे हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत दोन्ही देशांनी इराणवर क्षेपणास्त्र डागली आहेत. हा हल्ला होताच इराणनेही तुम्ही युद्ध चालू केले आता आम्ही ते संपवू असा इशारा देत भविष्यात या युद्धाची स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता इराणने सांगितल्याप्रमाणे जोरदार प्रतिहल्ला केला आहे. इराणने इस्रायलवर तब्बल 105 क्षेपणास्त्र डागले आहेत.

इराणच्या कोणकोणत्या भागांवर हल्ले

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर सध्या जगभरात तणावाची स्थिती आहे. इस्रायलने इराणवर केलेल्या या हल्ल्याला इम्प्रेसिव्ह स्ट्राईक असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेहरान, इस्फहान, कोम, खोर्रमाबाद यासह इतरही काही शहरांत हल्ले केले आहेत. इरारणमधील तेहरान येथील विद्यापीठ रोड, सर्वोच्च न्यायालय, न्याय मंत्रालय या महत्त्वाच्या परिसरातही हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामैनी यांचे निवासस्थानदेखील उद्ध्वस्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला होण्याआधीच खामैनी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

इराणने केला जोरदार हल्ला, 105 क्षेपणास्त्र डागले

इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले केल्यानंतर आता इराण दा देशदेखील पेटून उठला आहे. इराणने इस्रायलवर तब्बल 105 क्षेपणास्त्र डागल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात चाबहार बंदरालाही लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलनेही हे हल्ले झाल्याचे कबूल केले आहे. इराणने डागलेली क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचा इस्त्रायलकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, आता इस्रायलला इराणने प्रत्युत्तर दिल्यानंतर आता भविष्यात हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...