AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Us Ceasefire : मोठी बातमी ! इस्लामाबादमध्ये नको तेच घडलं.. इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटली, जेडी व्हान्स तातडीने अमेरिकेला..

पाकिस्तानमध्ये अमेरिका-इराण युद्धविराम शांतता चर्चा फिस्कटली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी जाहीर केले की, इराणने वॉशिंग्टनच्या अटी मान्य न केल्याने कोणताही करार झाला नाही आणि शिष्टमंडळ वॉशिंग्टनला परतणार आहे. यामुळे जागतिक चिंता वाढली असून, दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे.

Iran-Us Ceasefire : मोठी बातमी ! इस्लामाबादमध्ये नको तेच घडलं.. इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटली, जेडी व्हान्स तातडीने अमेरिकेला..
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स
| Updated on: Apr 12, 2026 | 8:02 AM
Share

पाकिस्तानमधून जगाची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. अमेरिका-इराण युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि शांततेसाठी त्यांची चर्चा सुरी होती. मात्र अमेरिका आणि इराण, य़ा दोघांमधील तील वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी रविवारी पहाटे पत्रकार परिषद घेत जाहीर केलं की, ते इराणसोबत कोणताही करार न करता वॉशिंग्टनला परतणार आहेत. इराण अमेरिकेच्या अटी स्वीकारत नाहीये त्यामुळे शिष्टमंडळ अमेरिकेत परत जात असल्याचं व्हान्स म्हणाले.

जेडी व्हान्स यांनी आज (12 एप्रिल) पहाटे घेतलेल्या पत्रकार परिशषदेत या चर्चेसंबंधी माहिती दिली. इराणसोबतच्या वाटाघाटींमध्ये त्रुटी राहिल्या असून, इराणी शिष्टमंडळाने वॉशिंग्टनच्या अटी मान्य केलेल्या नाहीत. अमेरिका करारासाठी तयार आहे, परंतु इराणने मोठे अडथळे निर्माण केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

दोन्ही देशातील चर्चा फिस्कटली…

जवळपास 21 तास चाललेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर, व्हान्स यांनी सांगितलं की दोन्ही देशांमध्ये “समाधानकारक करार” झालेला नाही. अमेरिकेने आपला अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव सादर केला होता, परंतु इराणने तो स्वीकारला नाही. अमेरिकेने आपल्या अटी आणि मर्यादा आधीच स्पष्टपणे सांगितल्या होत्या, ज्यामध्ये कुठे लवचिकता दाखवली जाऊ शकते आणि कोणत्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही याचा समावेश होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘ वाईट बातमी ही आहे की, आमच्यात करार झालेला नाही. मला वाटते की ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी जास्त वाईट बातमी आहे. त्यामुळे, कोणताही करार न करताच आम्ही अमेरिकेकडे परत जात आहोत… त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे.’ असं या निवेदनादरम्यान जेडी व्हान्स म्हणाले. ” या चर्चेत ज्या काही उणिवा होत्या, त्या पाकिस्तानींमुळे नव्हत्या; त्यांनी उत्कृष्ट काम केलं आणि आम्हाला व इराणला मतभेद मिटवून करारापर्यंत पोहोचण्यास मदत करण्याचा खरोखरच प्रयत्न केला. आम्ही गेल्या 21 तासांपासून वाटाघाटी करत आहोत आणि इराणींसोबत अनेक महत्त्वाच्या चर्चा केल्या आहेत.” असंही व्हान्स यांनी नमूद केलं.

इराणचा अणुकार्यक्रम हा या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इराण भविष्यात कधीही अण्वस्त्रे विकसित करणार नाही, याची हमी अमेरिका सातत्याने मागत आहे. अमेरिकेला इराणकडून “स्पष्ट आणि दीर्घकालीन वचनबद्धतेची” गरज आहे, परंतु आतापर्यंत असे कोणतेही आश्वासन मिळालेले नाही, असं व्हान्स यांनी सांगितलं.

मात्र इस्लामाबादसोबतची चर्चा अयशस्वी झाली असली तरी, अमेरिकेने राजनैतिक चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत. वॉशिंग्टन अजूनही इराणला आपल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ देत असल्याचे व्हान्स यांनी सूचित केले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ